अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती वडगाव येथे उत्सहात साजरी…

0
31

वडगाव मावळ दि.26 – माजी पंतप्रधान भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त वडगाव शहर भाजपा युवा मोर्चा व महिला आघाडी च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चित्रकला व रांगोळी स्पर्धेस वडगाव शहरातील स्पर्धकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

श्री पोटोबा मंदिर प्रांगणात झालेल्या या स्पर्धेत सुमारे ३०० शालेय विद्यार्थी यांनी चित्रकला स्पर्धा व १०० महिलांनी रांगोळी स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.

सायंकाळी भाजपाचे ज्येष्ठ नेते व पदाधिकारी यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह व रोख रक्कम देण्यात आली.यावेळी झालेल्या कार्यक्रमास श्री पोटोबा देवस्थान चे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, जेष्ठ नेते सोपानराव ढोरे, भाजपचे प्रभारी, भास्करराव म्हाळसकर, माजी सभापती रेवतीताई वाघवले, गुलाबराव म्हाळसकर, अरविंद पिंगळे, ऍड तुकाराम काटे, नारायणराव ढोरे,पंढरीनाथ भिलारे,विठ्ठलराव घारे, बाळासाहेब कुडे, यदुनाथ चोरघे यांच्यासह नगरसेवक दिनेश ढोरे, प्रविण चव्हाण ,अर्चना म्हाळसकर, किरण म्हाळसकर, सुनिता भिलारे, दिलीप म्हाळसकर, ऍड विजय जाधव, शामराव ढोरे, प्रसाद पिंगळे, किरण भिलारे, माजी सरपंच नितीन कुडे, सुधाकर ढोरे, रवींद्र म्हाळसकर आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनंता कुडे यांनी केले तर सूत्रसंचालन नगरसेवक रवींद्र काकडे यांनी केले.तसेच या कार्यक्रमाचे स्वागत युवा अध्यक्ष विनायक भेगडे यांनी व आभार धनश्री भोंडवे यांनी मानले.

या कार्यक्रमाचे नियोजन माजी व्यापारी अध्यक्ष भूषण मुथा, वैशाली म्हाळसकर, अश्विनी बवरे, पूजा पिंगळे, श्रेया भंडारी, प्रियंका भोंडवे, शीतल मुथा, काकडे, शेखर वहिले, रमेश ढोरे, प्रशांत चव्हाण, दिपक भालेराव, चेतन बाफना, कुलदीप ढोरे आदींनी केले.