अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार जन आंदोलन न्यासच्या तालुकाध्यक्ष पदी ॲड संजय पाटील…

0
54

तळेगाव : – अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनच्या मावळ तालुकाध्यक्ष पदी ॲड संजय पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली.

अण्णा हजारे प्रणीत भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासचे विश्वस्त व ज्येष्ठ कार्यकर्ते राधेश्याम जगताप , पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेश टाकळकर , ज्येष्ठ कार्यकर्ते विलास सुर्यवंशी , यांच्या उपस्थितीत समाजसेविका अर्चना म्हाळस्कर थिटे यांच्या बंगल्यावर झालेल्या बैठकीत ॲड संजय पाटील यांची मावळ तालुका अध्यक्ष पदी एकमताने निवड करण्यात आली .

यावेळी तळेगांव नगरपरिषदेचे कार्यक्षम नगरसेवक व माहिती अधिकार कार्यकर्ता अरुण माने,अर्चना म्हाळस्कर थिटे , नारायण ढमाले , कविता मोरे , सचिन रगडे ,ॲड गणेश जगताप , शिल्पा येवले उपस्थित होते . यावेळी कार्यकर्त्यांनी आपली ओळख व करत असलेल्या कामाची माहिती दिली तर विश्वस्त राधेश्याम जगताप आणि पुणे जिल्हा अध्यक्ष सुरेशराव टाकळकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले . अण्णा हजारे प्रणित भष्टाचारमार्गदर्शन केले . अण्णा हजारे प्रणित भष्टाचार मावळ तालुका यांच्या वतीने शाल पुष्पगुच्छ देवून विश्वस्त जगताप , जिल्हाध्यक्ष टाकळकर , कार्यकर्ते सुर्यवंशी यांचा सन्मान करण्यात आला . यावेळी जिल्हा अध्यक्ष सुरेश टाकळकर यांनी मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर केली.

यात अध्यक्ष म्हणून ॲड संजय पाटील , उपाध्यक्ष कविता विजय मोरे , सचिव पदि शिल्पा येवले , सहसचिव नारायण ढमाले , खजिनदार पदी सचिन रगड़े यांची तर जिल्हा सदस्य पदी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक अरुण माने , सामाजिक कार्यकर्त्या अर्चना म्हाळस्कर थिटे , प्रकाश पोरवाल यांची निवड करण्यात आली . ॲड संजय पाटील यांनी जिल्हा अध्यक्ष सुरेश टाकळकर आणि विश्वस्त राधेश्याम जगताप यांचे आभार मानले .