भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) महाराष्ट्राच्या राजकारणा बरोबरच कर्जत – खालापूर मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ” वज्रमूठ ” मजबूत होत असून सर्वत्र मशाल पेटत असताना दिसत आहे . शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांच्या कार्यकुशलतेवर विश्वास ठेवत अनेक कार्यकर्ते शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षात पक्ष प्रवेश करत आहेत . कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात पक्ष बांधणीसाठी शिव संपर्क दौरा केल्यापासून बहुसंख्य गावात पक्ष प्रवेश सोहळा पार पडला असताना रविवार दिनांक २८ जुलै २०२४ रोजी कर्जत तालुक्यातील अंत्रट वरेडी गावामधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेकांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यामुळे या मतदार संघात राष्ट्रवादीला ” खिंडार ” पाडले असून उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांचे हात मजबूत झाल्याचे चित्र येथे पहाण्यास मिळत आहे.
यावेळी बाबूराव लहाने , गुरुनाथ लहाने , ललित डायरे , लहू डायरे , किशोर लहाने , हिरामण कडव , राजाराम भगत , सौरभ लहाने , सागर डायरे , मनोहर भगत , प्रकाश डायरे या प्रमुख कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात पक्षप्रवेश केला . यावेळी उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांनी शिवसेनेच्या कर्जत मधील मध्यवर्ती ” शिवालय ” कार्यालयात शिवसेना पक्षात सर्वांचे स्वागत करत सर्व प्रवेशकर्त्यांना पुढील काळात पक्षाच्या माध्यमातून बळ देण्यात येईल , असे आश्वासन दिले.
याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांच्या समवेत तालुका संघटक बाबू घारे , विधानसभा अधिकारी अॅड.संपत हडप , तालुका अधिकारी प्रथमेश मोरे , तालुका चिटणीस कल्पेश खडे , उमरोली युवासेना विभाग अधिकारी संदेश हजारे , अजय कराळे, विभाग प्रमुख परेश काळण , माजी सरपंच दिपक काळण , जेष्ठ शिवसैनिक सावळाराम डायरे , अंत्रट शाखाप्रमुख निलेश डायरे , उपशाखाप्रमुख रवींद्र पेमारे , रवींद्र डायरे , गणेश लहाने , मंगेश डायरे , हरेश्वर डायरे , दिनेश लहाने , नितीन डायरे , आकाश शिंगे , संदेश जोशी आणि मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.