Thursday, June 1, 2023
Homeपुणेमावळअनेक वर्षांपासूनचा पाणी प्रश्न मार्गी लागल्याने, स्थानिकांकडून नगराध्यक्ष मयूर ढोरे यांचे विशेष...

अनेक वर्षांपासूनचा पाणी प्रश्न मार्गी लागल्याने, स्थानिकांकडून नगराध्यक्ष मयूर ढोरे यांचे विशेष आभार..

मावळ (प्रतिनिधी):आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या माध्यमातून नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या विशेष प्रयत्नाने वडगाव नगरपंचायत हद्दीतील प्रभाग क्रमांक 11 येथील निसर्ग वाटिका रेसिडेन्सी मधील रहिवाशी नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याचा विषय मार्गी लागला आहे.
आज या नवीन पाणी पाईपलाईनचा भूमिपूजन शुमारंभ नागरिकांच्या उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी नगराध्यक्ष मयूर ढोरे, मा सभापती गणेश ढोरे, नगरसेवक सुनील ढोरे, यशवंत शिंदे आणि निसर्ग वाटिका रेसिडेन्सी मधील रहिवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अनेक दिवसांपासून प्रलंबित असणारा पाणी प्रश्न मार्गी लावल्याबद्दल येथील नागरिकांनी नगराध्यक्षांचे विशेष आभार व्यक्त केले. सदर पाईप लाईनचे काम साधारणता चार ते पाच दिवसात पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित ठेकेदारांना करण्यात आल्या आहेत.
सदर पाणी पाईप लाईन संबंधित सुरू असलेल्या कामाची माहिती या भागातील नागरिकांना दिली असता महिला भगिनी आणि नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page