अपघाताची मालिका थांबाविण्यासाठी एकजुटीने आंदोलन करू ,डॉ किरण गायकवाड..

0
219

लोणावळा : लोणावळा शहरातील महामार्गावर होणाऱ्या दुर्घटनानबाबत शहराला कोणी वाली नाही असे वक्तव्य डॉ. किरण गायकवाड यांनी केले आहे.

लोणावळा शहरातील महामार्गावर दिवसेंदिवस अपघाताची मालिका सुरु असून यात विध्यार्थी व निष्पाप जीवांचा बळी जात असून यासाठी उपाययोजना कोण करणार.

प्रत्येक वेळी अशा घटना घडल्या की शहरात पोलीस व सर्वपक्षीय बैठक आयोजित केली जाते परंतु आजपर्यंत त्यातून काही तोडगा निघालेला नाही तसेच आजपर्यंत आपल्या शहरातील जाणाऱ्या महामार्गवर काही सुरक्षा कवच नाही यामुळे महामार्गावरील अपघाताचे प्रमाण वाढले असून प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे यात निष्पाप जीवांचा बळी जात आहे.

त्यासाठी विध्यार्थी, पालक, शिक्षक, नागरिक व सर्वपक्षीय कार्यकर्ते व पुढारी यांनी एकजुटीने रस्त्यावर उतरून आंदोलन करावे असे मत डॉ किरण गायकवाड यांनी व्यक्त केले आहे.

आता शहरातील नागरिक व विध्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी किती नागरिक आंदोलनास सहभागी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.