Friday, June 9, 2023
Homeपुणेमावळअबोली मयूर ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वडगांव शहरातील महिलांना ड्रायविंगचे मोफत प्रशिक्षण…

अबोली मयूर ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वडगांव शहरातील महिलांना ड्रायविंगचे मोफत प्रशिक्षण…

मावळ (प्रतिनिधी): महिलांचे सक्षमीकरण हाच ध्यास असलेल्या मोरया महिला प्रतिष्ठानच्या माध्यमातून वडगाव शहरातील तब्बल तीनशे महिलांना ड्रायव्हिंग प्रशिक्षणाचा शुभारंभ आज करण्यात आला.
शहरातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्यात आत्मविश्वास वाढविण्यासाठी मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने नेहमीप्रमाणे विविध योजना राबविल्या जात असतात.मोरया महिला प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली मयुर ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव शहरातील महिला भगिनींसाठी ड्रायव्हिंग प्रशिक्षण हा उपक्रम घेण्यात आला.या उपक्रमाचा शुभारंभ मा. ता. रा. महिला काँग्रेस अध्यक्ष दिपाली गराडे, प्रतिष्ठान अध्यक्षा अबोली ढोरे, नगरसेविका पुनम जाधव, पुनम वायकर, चेतना ढोरे, पूजा वहिले, कविता नखाते, सोनाली मोरे, प्रतीक्षा गट, सुषमा जाजू,जयश्री जेराटागी यांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला.
या चारचाकी गाडी ड्रायव्हिंग प्रशिक्षणात शहरातील सुमारे 300 महिला सहभागी झाल्या असून या प्रशिक्षणाचा कालावधी तब्बल तीन महिने असणार असून पुढेही नाव नोंदणी चालू राहणार आहे. ड्रायव्हिंग प्रशिक्षणात प्रत्येकी तीस तीस महिलांच्या स्वतंत्र बॅचेस करण्यात आल्या आहेत.

यावेळी राष्ट्रवादी महिला अध्यक्षा दिपाली गराडे, मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे आणि मान्यवरांच्या हस्ते सहभागी प्रशिक्षणार्थी महिलांना प्रतिनिधिक स्वरूपात लर्निंग लायसन्स देण्यात आले.यावेळी मोरया महिला प्रतिष्ठानच्या संचालिका आणि शहरातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

You cannot copy content of this page