अब के बारी ,शिवसेना हमारी ,कर्जतमध्ये भाजपला मोठे खिंडार !

0
414

आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली विद्यमान तालुका उपाध्यक्षांसह अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश..

भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे)कर्जत – खालापूर मतदार संघात शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या नेतृत्वाखाली भगवेमय वातावरण दिसून येत आहे.त्यांची कार्य करण्याची पद्धत , विभागवार निधी आणून परिसराचा होणारा कायापालट , समस्या तिथे निवारण , यामुळे दिवसेंदिवस त्यांच्याकडे आकर्षित होणारा तरुणवर्ग म्हणूनच तालुक्यात आमदार महेंद्रशेठ थोरवे व शिवसेना यांच्या झंझावाताने प्रत्यक्षात विकासाची गंगा अवतरलेली दिसून येत आहे. मुख्यमंत्री उद्धवजी साहेब ठाकरे व युवासेनाप्रमुख अदित्यजी ठाकरे यांचा वरदहस्त प्राप्त असल्यानेच आमदार महेंद्रशेठ थोरवे प्रत्तेक क्षेत्रात मुसंडी मारताना दिसत आहेत.
त्यांच्या या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भाजपचे कर्जत तालुका उपाध्यक्ष पंढरीनाथ पिंपरकर व गौतम मुंढे यांनी आपल्या असंख्य सहकार्यांसह शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.गुरुवार दि .१३ मार्च २०२२ रोजी सकाळी अकरा वाजता शिवतीर्थ पोसरी येथे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या हस्ते शिवसेनेचा भगवा झेंडा उंचावत पाथरज जिल्हा परिषद विभागातील भाजपचे तालुका उपाध्यक्ष पंढरीनाथ पिंपरकर व सावेळे जिल्हा परिषद विभागातील भाजपचे दुसरे तालुका उपाध्यक्ष गौतम मुंढे यांनी आपल्या असंख्य सहकार्यांसह शिवसेनेत जाहीर पक्षप्रवेश केला.
त्याप्रसंगी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या समवेत उपजिल्हाप्रमुख भाई गायकर, विधानसभा संपर्कप्रमुख पंकज पाटील, तालुका संघटक शिवराम बदे, उपतालुकाप्रमुख दिलीप ताम्हाणे, कर्जत न.प. चे नगरसेवक संकेतदादा भासे, जिल्हा परिषद विभागप्रमुख योगेश दाभाडे, पंचायत समिती विभागप्रमुख संदेश सावंत, बाजीराव दळवी, रमेश मते, ज्ञानेश्वर भालिवडे, उत्तम शेळके, नितीन धुळे, भगवान घुडे, विजय घुडे, मंगेश सावंत, संतोष पिंपरकर, सोपान भालिवडे, नवनाथ कदम, रामदास घरत, महेश घुडे, संतोष घुडे आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भाजप ला पडलेल्या या खिंडारात या दोन दिग्गज नेत्यांसह युवा कार्यकर्ता हर्षद पिंपरकर, किरण सावंत, पंढरीनाथ ठोंबरे, विलास जाधव, राघो ठोंबरे, मनोहर ठोंबरे, लहु ठोंबरे, जैतु ठोंबरे, संतोष ठोंबरे, अजय ठोंबरे, भरत ठोंबरे, आदिनाथ ठोंबरे, आदित्य पारधी, पद्माकर ठोंबरे, महेंद्र वारे, गणेश ठोंबरे, सचिन पारधी, दत्ता ठोंबरे, योगेश ठोंबरे, सखाराम जाधव, मंगल ठोंबरे, जिजाबाई वाघ, लताबाई दरोडे, कमाबाई जाधव, ताराबाई ठोंबरे, सुमन जाधव, सुरेखा ठोंबरे, निवीता ठोंबरे, देवकी वारे, सोनी ठोंबरे, सुहा ठोंबरे, नमीबाई ठोंबरे, सगुणा पारधी, जयश्री ठोंबरे, अलका ठोंबरे, तुळशी ठोंबरे, उर्मिला बांगारे, आशा ठोंबरे, हौसाबाई ठोंबरे, सविता ठोंबरे, तान्हाबाई ठोंबरे या पिंपरकरपाडा, पेठ व हिरेवाडी येथील अनेकांनी शिवसेना पक्षात आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली जाहिर पक्षप्रवेश केला.
भाजपाचे पंढरीनाथ पिंपरकर व गौतम मुंढे तसेच सर्व सहकारी वर्गाचे शिवसेनेत स्वागत करून त्यांनी घेतलेला निर्णय योग्य असून तालुक्यात व विभागात आमची ताकद वाढली असून भविष्यात येणाऱ्या काळात या विभागात यश आमचेच असेल असे मत आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी व्यक्त केले.