अमरावती महापालिका आयुक्त आष्टीकर यांच्यावर शाई फेकल्याच्या निषेधार्थ लोणावळ्यात काम बंद आंदोलन…

0
90

लोणवळा : अमरावती महानगरपालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकल्याच्या घटनेच्या निषेधार्त लोणावळा नगरपरिषद कर्मचारी यांनी आज लेखणीबंद आंदोलन केले.

अमरावती शहरातील राजापेठ अंडर बायपास उड्डाणपुलाची पाहणी करण्यास गेलेल्या महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर दोन महिलांनी शाई फेकल्याची घटना बुधवारी घडली आहे. राजापेठ अंडर बायपास उड्डाणपुलावर युवा स्वाभिमान पार्टीचे संस्थापक तथा आमदार रवि राणा यांच्या नेतृत्त्वात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा १२ जानेवारी रोजी बसविण्यात आला होता. मात्र, तो प्रशासनाने रात्रीतून उचलल्याने वाद विकोपाला गेला. त्याच अनुषंगाने काही महिलांनी महापालिका आयुक्तांवर शाई फेकल्याची ही घटना घडल्याची चर्चा होत आहे. 

या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी व संवर्ग कर्मचारी संघटना, त्यांच्या सर्व शाखा आणि सर्व जिल्ह्यातील कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून लेखनी बंद आंदोलन पुकारले होते.यावेळी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव सह सर्व नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांनी या आंदोलनास सहभागी होऊन निषेधाच्या घोषणा दिल्या.