Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडअमित देशमुख यांच्यासह खोपोली , नेरळ विभागातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश...

अमित देशमुख यांच्यासह खोपोली , नेरळ विभागातील अनेकांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत खालापूर मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुधाकर भाऊ घारे यांचे वजन दिवसेंदिवस वाढत चालले आहे . नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेते सुधाकर भाऊ घारे यांच्या नेतृत्वाखाली ” गाव दौरा ” केला असल्याने दर रविवारी अनेकांचा पक्ष प्रवेश होत असताना आज रविवार दिनांक ४ ऑगस्ट २०२४ रोजी खालापूर तालुक्यातील छत्तिशी विभागातील नारंगी गावातील शिवसेना पक्षाचे प्रवक्ते व आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या खास मर्जीतील ” अमित सुभाष देशमुख ” यांनी आपल्या अनेक समर्थक व त्यांची खरी ताकद असलेले ३०० आदिवासी बांधवां समवेत आज सुधाकर भाऊ घारे यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला . यामुळे शिवसेना शिंदे गटाला ” खिंडार ” पडले असून आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना झटका दिला आहे . तर खोपोली आम आदमी पक्षाचे नेते शिवाजी शिव चरण तसेच नेरळ विभागातील अनेकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने सुधाकर भाऊ घारे यांचे हात मजबूत झाले आहेत.

यावेळी या पक्ष प्रवेश सोहळ्यात सुधाकर भाऊ घारे म्हणाले की , आम्ही कुणाचा अपमान करत नाही , सर्वांचा सन्मान करण्याचे संस्कार आमच्यावर झाले आहेत , म्हणून सर्वांना मानसन्मान देवून ताकद देण्याचे काम केले जाईल . सर्वाँना घेवून पुढे जायचे आहे , ही निवडणुक लढायची आहे , आणि तुमच्या ताकदीच्या जोरावर निवडून जायचे आहे , विट मारली तर विरोधकांना उत्तर दगडाने दिले जाईल , असा विश्वास त्यांनी सर्वाँना दिला . सोशल मीडियावर ट्रोल करणारे फोन करून सांगतात , आमचे काम हे पगारावर आहे , म्हणून काम करणाऱ्या कडून कुणालाही घाबरायची गरज नाही , आज आपला पक्ष १ नंबरचा आहे , ” राष्ट्रवादी पक्ष व मी सुधाकर घारे ” तुमच्या पाठीशी सक्षम आहे , येणाऱ्या २०२४ च्या निवडणुकीत सर्व हुकुमशाही संपुष्टात येईल , असा विरोधकांना टोला त्यांनी दिला . कंपन्या असताना स्थानिकांना रोजगार नाही , उपोषण करावे लागते , पाण्याची टंचाई आहे ती भविष्यात दूर करण्याचा प्रयत्न करू , म्हणूनच सर्वांगीण विकासासाठी निवडणूक जिंकायची आहे , येथील सर्वांची रोजगाराची गरज , सुसज्ज दवाखाना , पाणी टंचाई , रस्ते , आरोग्य , यांचे स्वप्न आम्ही साकार करू असे अभिवचन त्यांनी या प्रसंगी दिले.

यावेळी व्यासपीठावर नेते सुधाकर भाऊ घारे , प्रदेश सचिव भरत भाई भगत , ता. अध्यक्ष भगवान शेठ चचे , कर्जत शहर अध्यक्ष भगवान शेठ भोईर , जिल्हा नेते शिवाजी दादा खारीक , उद्योजक अशोक शेठ सावंत , खालापूर अध्यक्ष संतोष बैलमारे , एच आर पाटील , महिला अध्यक्षा रंजना धुळे , सुरेखा खेडकर , युवा अध्यक्ष स्वप्नील पालकर , केतन बेलोसे , सुनील गायकवाड , आर के , श्रीखंडे , हरपुडे , मा. नगरसेवक उमेश गायकवाड , भूषण पाटील खानाव त्याचप्रमाणे मतदार संघातील अनेक पदाधिकारी, महिला आघाडी उपस्थित होते.

यावेळी नेरळ – उषा ताई देशमुख व कविता शिंगवा यांच्या नेतृत्वाखाली नेरळ आंबेवाडी , बापू कृपा चाळ , लकी होम , समाधान चाळ , तर आम आदमी पार्टी खोपोली – शिवाजी शिव चरण यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाला . तर ” सुधाकर भाऊ घारे मंच ” अनेक कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आल्या , राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी परिषद अनेकांची नियुक्तीपत्र देण्यात आले . छतिशी विभाग नेते अमित सुभाष देशमुख यांना ” राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते ” म्हणून निवड करण्यात आली.
यावेळी ते म्हणाले की , शिवसेनेचा प्रवक्ता असतानाही माझ्यावर अन्याय अत्याचार झाला , आदिवासी बांधव माझी ताकद आहे , त्यांचा अपमान आमदार महेंद्र थोरवे यांनी करून नारंगी च्या गद्दाराला जवळ करून मला लांब केले , हेच गद्दार तुमच्या पराभवाचे कारण बनतील , येणाऱ्या निवडणुकीत आम्ही ते दाखवून देवू . सुधाकर भाऊ घारे तुम्ही जाल तिथे आम्ही येवू , पण निवडून तुम्हालाच देवू , असे मत अमित देशमुख यांनी व्यक्त केले . यावेळी प्रदेश सचिव भरत भाई भगत, सुरेखा खेडकर , भूषण पाटील , यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page