Friday, June 9, 2023
Homeपुणेलोणावळाअल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत विनयभंग करणाऱ्या आरोपीस लोणावळा शहर पोलिसांकडून...

अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत विनयभंग करणाऱ्या आरोपीस लोणावळा शहर पोलिसांकडून अटक…

लोणावळा (प्रतिनिधी): अल्पवयीन मुलीला फुस लावत तीला पळवून नेत विनयभंग केल्याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात रात्री एकावर गुन्हा दाखल करत, अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याप्रकरणी अहमद मोहम्मद रफी शेख (रा. मानकुर्द करबला मैदानाजवळ चिताह कॅम्प, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याच्या विरोधात भादंवी कलम 363, 354, 354 (अ),पोस्को 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोणावळ्यातील एका अल्पवयीन मुलीला एका युवकाने पळवून नेली असल्याची पोस्ट काल सायंकाळ पासून सोशल मिडियावर व्हायरल झाली होती. त्या अनुषंगाने हिंदू समिती सदस्य, रायवुड भागातील युवा कार्यकर्ते व पोलीस पथक शोध घेत असताना, स्थानिकांना रायवुड भागात सदरचा आरोपी त्या अल्पवयीन मुलीसह मिळून आला. त्याला पकडून शहर पोलिसांच्या ताब्यात दिले. शेख याच्यावर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे ह्या करत आहेत.

You cannot copy content of this page