Tuesday, November 29, 2022
Homeक्राईमअल्पवयीन मुलीवर नात्यातील व्यक्तीकडून अत्याचार, आरोपीस लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून अटक..

अल्पवयीन मुलीवर नात्यातील व्यक्तीकडून अत्याचार, आरोपीस लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून अटक..

लोणावळा (प्रतिनिधी) :लोणाळ्यात पोटापाण्यासाठी आलेल्या कुटुंबातील एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या नात्यातीलच व्यक्तीकडून दारू पाजून अत्याचार करण्यात आल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे, याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले आहे.
याबाबत पीडित मुलीच्या वडिलांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. त्यानुसार शंकर पानसिंग बहाद्दूर थापा (वय 24, रा. सध्या वरसोली, मावळ, मूळ रा. शिवडी, पो. चौरपाटी, जि. अझाम नेपाळ ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात भादवी कलम 376(2) (एफ ), बाल लैंगिक अत्याचार कायदा 2012 चे कलम 4,8,10,12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लोणावळा शहराजवळ असलेल्या वरसोली , ता . मावळ याठिकाणी वरील घृणास्पद प्रकार घडला आहे.
आरोपी शंकर थापा याने पीडित मुलगी आणि तिचा 7 वर्षीय भाऊ यांना भाजीपाला खरेदी करण्यासाठी म्हणून घरातून बाहेर नेले . त्यानंतर त्यांना एका पडीक जमिनीवर घेऊन जाऊन पीडित मुलीला त्याठिकाणी दारू पाजून तिच्यावर शारीरिक अत्याचार केला . याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आरोपीस थोड्याच वेळात अटक करून गुन्हा दाखल केला आहे . पुढील तपास महीला पोलीस उपनिरीक्षक सुरेखा शिंदे या करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page