अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना अवघ्या 12 तासात केली अटक…

0
1885

लोणावळा दि.17: अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोन आरोपींना लोणावळा ग्रामीण पोलीसांनी अवघ्या 12 तासाच्या आत अटक केली आहे.

वेहेरगाव (ता. मावळ, जि. पुणे) येथील एका अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी बलात्कार केल्याची तक्रार दि.16 रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तक्रार दाखल होताच अवघ्या 12 तासांच्या आत पोलिसांनी त्या दोन आरोपींचा शोध लावून त्यांना अटक केली आहे.

आरोपी कावजा उर्फ महादू बबन बैकर ( वय 24, रा. वेहेरगाव, ता. मावळ, जि. पुणे ) आणि यतीन उर्फ अजिंक्य प्रकाश पडवळ ( वय 27, रा. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे ) या दोघांना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरुद्ध गु.र.नं.378/2021, भा. द. वी.कलम 376(3),376(D),376(DA),324,323,504,506,34,बालकांचे लैंगिक अपराधपासुन संरक्षण अधिनियम कायदा कलम 4,8,12 सह, अनुसूचित जाती जमाती अधिनियम कायदा कलम 3(1), (w)(ii)3(2), (va),3(1)(r)3(1)(5)6, तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66,67नागरी हक्क संरक्षण अधिनियम कायदा कलम 7(1) भारतीय दंड संहिता कलम 366(A) प्रमाणे गुन्हा दाखल करून दोन्ही आरोपींना न्यायालयाने 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील, पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, पो.स. ई.अनिल लवटे, सहा. फौजदार सिताराम बोकड, हवा. कुतूबुद्दीन खान, शकील शेख, अमित ठोसर, महिला पो. हवालदार घुगे, महिला पो. नाईक कोहिनकर, पो. ना. शरद जाधवर, प्रणय उकिर्डे, गणेश होळकर, किशोर पवार, पो. कॉ. रईस मुलाणी, मच्छिन्द्र पानसरे, नागेश कमठणकर यांच्या पथकाने सदरची कारवाई केली असून पुढील तपास लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील करत आहेत.

तसेच महिला व मुलींच्या छेडछाड संबंधी काही तक्रार असल्यास लोणावळा ग्रामीण दूरध्वनी क्र.02114-273036 वर संपर्क करा असे आवाहन लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आले आहे.