Tuesday, September 26, 2023
Homeपुणेलोणावळाअवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ओळकाईवाडी येथून एकास केली अटक....

अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी ओळकाईवाडी येथून एकास केली अटक….

लोणावळा दि.24: विनापरवाना शस्त्र बाळगल्या प्रकरणी नवनाथ एकनाथ शिंदे यास लोणावळा ग्रामीणच्या तपास पथकाने मोठ्या शिताफिने घेतले ताब्यात.लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहिती नुसार पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांना एक इसम ओळकाई वाडी परिसरात शस्त्र बाळगून असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली.

मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक मोरे यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या तपास पथकास सदर इसमाचा तात्काळ शोध घेण्याच्या सूचना दिल्या,सूचना मिळताच लोणावळा ग्रामीणचे तपास पथक ओळकाई वाडी परिसरात सदर इसमाचा शोध घेत असताना एक संशयीत इसम पोलिसांना बघून पळण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास येताच पोलीस तपास पथकाने त्या इसमास मोठया शिताफिने ताब्यात घेतले त्याची अंग झडती केल्यास त्याकडे एक गावठी पिस्टल मिळून आली तसेच त्याकडे अधिक तपास केल्यास सदर इसम हा ओळकाई वाडी येथील असून त्याचे नाव नवनाथ एकनाथ शिंदे असल्याचे समजले, सदर आरोपीस अटक करून अवैधरित्या शस्त्र बाळगल्याप्रकरणी गु. र. क्र.353/2021 भा. द. वी.का.कलम 3/25, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली आहे.

सदर आरोपीस 26 तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून त्याकडे ते वापरण्याचे कारण अथवा ते कुठे वापरणार यासंदर्भात लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करत आहेत.
तसेच अवैध शस्त्र बाळगणे अथवा त्याबाबत कोणाला काही माहिती असल्यास पोलिसांना संपर्क करावा असे आवाहन लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी केले आहे.


पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक नितेश गट्टे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, उपनिरीक्षक सचिन बनकर, उपनिरीक्षक अनिल लवटे, पोलीस हवा. अमित ठोसर, पोलीस नाईक गणेश होळकर, पोलीस नाईक शरद जाधवर, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल रहीस मुलाणी यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

- Advertisment -