Monday, July 22, 2024
Homeपुणेलोणावळाअश्लील व्हिडीओ चित्रीकरण करताना लोणावळा ग्रामीण पोलिसांचा छापा अठरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

अश्लील व्हिडीओ चित्रीकरण करताना लोणावळा ग्रामीण पोलिसांचा छापा अठरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल…

लोणावळा : भारत देशामध्ये अश्लील व नग्न चित्रीकरणास तसेच प्रसारणास बंदी असल्याचे माहिती असताना देखील स्वतःच्या आर्थिक फायदयासाठी संगनमताने अश्लील चित्रफित बनविणाऱ्या 15 जणांसह त्यांना बंगला भाड्याने देणाऱ्या तीन जणांवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भादवि कलम 292, 293, 34 माहीती तंत्रज्ञान अधिनियम 2008 कायदा कलम 67, 67 (A), स्त्रियांचे असभ्य प्रतिरुपन अधिनियम 1986 कायदा कलम 3, 4, 6, 7 प्रमाणे शुक्रवारी (29 मार्च) रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस उप निरीक्षक भारत भोसले यांनी सरकारी फिर्याद दिली आहे. यानुसार विश्णु मुन्नासाहब साओ (वय-30, रा.16 परगना, कोलकत्ता) , जावेद हबीबुल्ला खान (वय-35, रा. आहरा उमरी, जि. बस्ती, उत्तरप्रदेश), अलका राज के राजन (वय 23, रा. आरपी, साउथ वेस्ट दिल्ली), नेहा सोमपाल वर्मा (वय 38, रा.गणेशपुरी, मुजफानगर, उत्तरप्रदेश), रिया वासु गुप्ता (वय 21, रा. लक्ष्मीनगर, शखरपुर,दिल्ली), बुध्दसेन बरदानीलाल श्रीवास (वय-29, रा. महाकाली कॉलनी, चंद्रपुर),समीर मेहताब आलम (वय 26, रा. अमरोहा,राईड मॉक्सी, उत्तरप्रदेश), अनुप मिथीलेष चौबे (वय 29, रा. काशीबाई चाळ कांदिवली ईस्ट, मुंबई), रामकुमार श्रीभगवान यादव (वय 21, रा. रोनक सिटी, शाम कॉलनी,हरियाणा), विना भारत पोवळे (वय 32, रा. केंगार चाळ, खोपट, ठाणे), मैनाज जाहीद हुसेन खान (वय 28, रा. सनसिटी, नालासोपारा वेस्ट, जि. पालघर), राहुल सुरेश नेवरेकर (वय 38, रा. मोहनचाळ, वागळे इस्टेट, ठाणे), अनिकेत पवन शर्मा (वय 19,व्यवसाय मेकअप आर्टीस्ट,रा.रूद्राक्ष रेसिडेन्सी, पलसाना, सुरत, राज्य गुजरात) , वंशज सचीन वर्मा (वय 21, रा. डेहराखास, डेहराडुन), मनीश हिरामण चौधरी (वय 20, रा. शास्त्रीनगर, हरीयाणा) यांच्यासह बंगला चालक सुखदेव चांगदेव जाधव (वय 52, रा.मळवली, ता. मावळ), आकेष गौतम शिंदे (वय 32, रा. मळवली, ता. मावळ) व सनी (वय 32, रा. मळवली, ता. मावळ) व सनी विलास शेंडगे (वय 35, रा. मळवली, ता. मावळ, जि.पुणे) यांच्या विरोधात सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 मार्च 2024 रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या पूर्वी पाटण गावाच्या हद्दीत असलेल्या आर्णव व्हील या बंगल्यात सदरचे अश्लील चित्रीकरण करण्यात आले असल्याचे लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ अधिकचा तपास करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page