![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
मावळ (प्रतिनिधी): आंदर मावळातील टाकवे बुद्रुक, माळेगाव खुर्द , माळेगाव बुद्रुक , तळपेवाडी , पिंपरी येथील नळ पाणीपुरवठा योजनेसाठी आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्याने एकुण चार कोटी एक लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून या योजनेचा भूमिपूजन समारंभ रविवार दि .27 रोजी महिला भगिनींच्या शुभहस्ते व मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाला .
जलजीवन मिशन अंतर्गत माळेगाव खुर्द नळ पाणीपुरवठा योजनेसाठी एक कोटी पाच लक्ष , पिंपरीसाठी एक कोटी एक्केचाळीस लक्ष , माळेगाव बु.तळपेवाडीसाठी एक कोटी पंचावन्न लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे .
यानुसार माळेगाव खुर्द येथे 25 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी व साडेतीन किलोमीटर पाईपलाईन,पिंपरी येथे 29 हजार लिटर क्षमतेची टाकी व सहा किमी पाईपलाईन, तर माळेगाव बु .तळपेवाडी येथे 8 किमी पाईपलाईन करण्यात येणार आहे .या योजनेनुसार प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहचविण्यात येणार आहे . तसेच प्रत्येक ठिकाणी फिल्टर प्लांट उभारण्यात येणार असल्याची माहिती आमदार शेळके यांनी दिली.
आंदर मावळातील दुर्गम भागात असणारी ही गावे आहेत . येथील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नव्हते . या समस्येची दखल घेत आमदार सुनिल शेळके यांनी पाठपुरावा करुन या गावातील नागरिकांसाठी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे.
या योजनेमुळे येथील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहचणार असल्यामुळे ग्रामस्थांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार मानले . यावेळी माजी जि . प . सदस्या शोभा कदम , राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष दिपाली गराडे , कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके , संगिता शेळके , माजी सभापती शंकरराव सुपे , लक्ष्मणराव ठाकर , दत्तात्रय पडवळ , सरपंच साधना काठे , उपसरपंच अंकिता गायकवाड , सदस्य बाळासाहेब खंडागळे , शंकर बोऱ्हाडे , रोहिणी कोकाटे , कुंदा बोन्हऱ्हाडे , ग्रामसेवक राहुल देशमाने , राजेश कोकाटे , मारुती करवंदे , सरपंच इंगळुण सुदाम सुपे , भरत जोरी , कल्पेश मराठे , सुनिल ताते , अंकुश ठाकर , बाबासाहेब घाडगे , कमल कोकाटे , अरुण मोरमारे , दशरथ दगडे , यमाजी बोऱ्हाडे , चिंधु बोऱ्हाडे , सविता बो – हाडे , शशिकला सातकर , आदिका तनपुरे , अनिता आंद्रे आदी उपस्थित होते .