![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
लोणावळा (प्रतिनिधी): महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कुलस्वामिनी आई एकविरा देवीची चैत्री यात्रा 27 व 28 मार्च रोजी कार्ला गडावर होणार आहे. यात्रेदरम्यान परिसरात मध्य विक्रीस तीन दिवस बंदी घालण्यात आली आहे. त्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी पारित केले आहेत.
श्री एकविरा देवीच्या यात्रे निमित्त व पालखी सोहळयाच्या निमित्ताने वेहेरगाव,कार्ला,मळवली, वरसोली,वाकसई,ता.मावळ या गावातील सर्व प्रकारच्या मद्य विक्री अनुज्ञप्ती तीन दिवस बंद करण्याचे आदेश पारीत करण्यात आले आहेत.
सदर यात्रेसाठी राज्यातुन सुमारे 5 ते 6 लाख भाविक यात्रेसाठी येत असतात, व त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी, मागील वर्षीच्या धर्तीवर श्री एकविरा यात्रेनिमित्त महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम, 1949 मधील नियम 142 अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसार डॉ. राजेश देशमुख यांनी दि. 27 मार्च, 28 मार्च,29 मार्च हे तीन दिवस वेहेरगाव, कार्ला, मळवली, वरसोली, वाकसई, या गावातील सर्व प्रकारच्या मद्य विक्री अनुज्ञप्ती बंद करण्याचे आदेश पारीत करीत आहे.
उपरोक्त नमुद केलेल्या दिवशी सर्व प्रकारच्या मद्य अनुज्ञप्ती बंद ठेवायच्या असुन त्याबाबत नुकसान भरपाई दिली जाणार नाही. तसेच सदर आदेशांचे उल्लंघन झाल्यास त्यांचेविरुध्द महाराष्ट्र मद्यनिषेध अधिनियम, 1949 व त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार योग्य ती कडक कारवाई केली जाईल असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.