Friday, December 8, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडआठवले साहेबांची अस्मिता आणि अस्तित्वासाठी कुणाचीही गय केली जाणार नाही-धर्मानंद गायकवाड..

आठवले साहेबांची अस्मिता आणि अस्तित्वासाठी कुणाचीही गय केली जाणार नाही-धर्मानंद गायकवाड..

बैठकीत राष्ट्रवादी , बीएसपी , एसआरपी व बंडखोर कार्यकर्ते यांत कुठे आहेत निष्ठावंत – हिरामण गायकवाड..

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे)रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या अस्तित्वाची व अस्मितेचा प्रश्न असेल तेंव्हा जे कार्यकर्ते पक्षाचा प्रोटोकॉल न पाळता पक्ष विरोधी कारवाया करतील त्यावेळी त्यांची गय केली जाणार नाही , अशी रोखठोक प्रतिक्रिया आरपीआय चे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख धर्मानंद गायकवाड यांनी व्यक्त करत सर्व कार्यकर्त्यांनी कर्जत तालुक्यात आरपीआय पक्षाचे चांगले काम चालू असताना ” खो ” घालण्याचे काम करू नये , असे आवाहन देखील त्यांनी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शाखा कर्जत तालुक्याच्या वतीने रॉयल गार्डन च्या सभागृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते , त्यावेळी ते बोलत होते . यावेळी विचार पिठावर आरपीआय जिल्हा संपर्कप्रमुख धर्मानंद गायकवाड , ता.अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड , महिला ता.अध्यक्ष अलका सोनावणे , कर्जत शहर अध्यक्ष वैशाली महेश भोसले , महासचिव अनंता खंडागळे , त्याचप्रमाणे तालुक्यातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यावेळी ते पुढे म्हणाले की , १५ जुलै २०२२ रोजी आरपीआय चे राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या आदेशानुसार पदाधिकारी नियुक्ती सुधागड पाली येथे झाल्या ,या निवडणूक प्रक्रिया कोकण प्रदेश अध्यक्ष भाई जगदीश गायकवाड व वरिष्ठ अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली झाल्या , त्यावेळी कर्जत तालुक्यातील कुणीच कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झाले नाहीत , मग आताच का कर्जत ता. अध्यक्ष हिरामण गायकवाड यांना विरोध दर्शविता , असा सवाल त्यांनी उपस्थित केला . आज ता.अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्या अध्यक्ष काळात चांगल्या प्रकारे काम होत आहेत , मात्र काल घेतलेल्या बैठका म्हणजे पक्षात ” खो ” घालण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
तर कालच्या बंडखोर कार्यकर्त्यांच्या बैठकीबाबत देखील त्यांनी सडेतोड उत्तर दिले . पक्षात संभ्रम कुणी निर्माण करू नये आम्ही कुठल्याही कार्यकर्त्याला डावळत नसून जेष्ठ नेते मारुती गायकवाड यांनी सांगितले वृक्ष आम्ही लावले फळ हे खातात , येथे लागतात जातीचे , ते येड्या गबाळ्याचे काम नाही , यावर उत्तर देताना ते म्हणाले की , ह्यांना ह्यांच्या गावात निवडून येता येत नाही , डिपॉझिट जप्त होते , त्यांनी आम्हाला पक्षाची रणनिती सांगू नये , त्यांनी पक्ष वाढीसाठी काम करावे , असा सल्लाही त्यांनी दिला . सर्वांनी एकत्रित यावे , काहींची भूमिका संशयास्पद आहे , पक्ष विरोधी कारवाया निदर्शनास आल्यानेच एकाची हकालपट्टी केली आहे , म्हणून दुसर्यांना धसका लागला आहे , म्हणून पक्षाची बदनामी होईल , असे करू नये , सर्वांनी एकत्रित यावे , आम्ही ही पक्षाचे निष्ठावंत आहोत , कालच्या बैठकीला आम्हालाही बोलावले असते , तर आम्ही ही आलो असतो , मग तुम्ही निष्ठावंत कसे , याबद्दल संशय वाटत आहे , आठवले साहेबांनी दिलेला ता अध्यक्ष यांना हे मानत नसतील तर ते आठवले साहेबांना देखील मानत नसतील , ता अध्यक्षांना संपर्क करूंनच बैठका घेणे गरजेचे आहे , यावर त्यांनी प्रकाश टाकला.
मागच्या उपोषणाला जेंव्हा हे बसले तेंव्हा मागच्या दाराने उपोषण ज्यांच्या विरोधात होते त्यांच्याच घरात हे दिसले , म्हणून आयत्या घरात रेघोट्या मारण्याचे काम आम्ही करत नाहीत ,अश्या बैठका घेऊन दिशाभूल करण्याचे काम करत आहेत , या सर्व बाबी मी वरिष्ठांना कळविणार आहे.जिल्हा , तालुका अध्यक्ष यांना विचारत नसतील तर ते नक्की कुठले राजकारण करत आहेत , असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला. दिवंगत किशोर भाई गायकवाड यांच्या घरात त्याग असल्यानेच हिरामण भाई गायकवाड यांना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले साहेब यांनी ता.अध्यक्ष म्हणून निवड केली आहे , पक्षाचा प्रोटोकॉल नुसार काम करा , असे आवाहन करत , सर्वांनी ता. अध्यक्षांच्या मार्गदर्शना खाली काम करा , असे मत त्यांनी व्यक्त केले .तर माथेरान चे अनिल गायकवाड यांचा देखील त्यांनी समाचार घेतला.
पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशाने आरपीआय – भाजप , शिवसेना शिंदे गट यांच्याशी युती आहे , भविष्यात जो पक्षाचा आदेश पाळणार नाहीत त्यांच्यावर पक्ष शिस्त भंगाची कारवाई होणार , असे सांगत समेट घडवू , ऐकलं नाही तर विद्रोह होणार , आणि कुणाला नवीन पक्षात जायचं असेल , तर आम्ही कुणालाही रोखणार नाही ,म्हणूनच प्रवाहा बरोबर या , तुमचे स्वागत आहे , असे आवाहन जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड यांनी केले.तर कर्जत ता.अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांनी कालच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस , बीएसपी , एसआरपी व बंडखोर कार्यकर्तेच होते , त्यात कोणीही आरपीआय पक्षाचे निष्ठावंत दिसले नाहीत , असे मत व्यक्त करत सर्वांनी पक्षाच्या प्रोटोकॉल प्रमाणे वागावे , असे आवाहन त्यांनी केले . तर ता.महिला अध्यक्षा अलका सोनावणे यांनी महिलांची मोठी फळी येणाऱ्या काळात उभी रहाणार असून पक्षाचे काम जोरात चालू असल्याचे सांगितले , तर कर्जत शहर अध्यक्षा वैशाली महेश भोसले यांनी यापूर्वी कार्यकर्ते आपल्या नगरसेवकांकडे गेले तरी कुणाची कामे होत नव्हते , असा आरोप करत हे लावत असलेल्या बॅनर वर आरपीआय पक्षाचे नाव नसते , प्रोटोकॉल नुसार पक्षाच्या जिल्हा – तालुका – शहर अध्यक्षांचे फोटो नसतात असा सवाल करत यांनी बेरोजगार तरुणांना कुठले काम दिले का ? असा प्रश्न उपस्थित केला.
गुंडगे प्रभागात आदिवासी वाडीत शौचालय नाहीत , रस्ते नाहीत , गुड शेफर्ड शाळेच्या येथील अद्यापी रस्ता झाला नाही , अश्या समस्या त्यांनी मांडल्या.यावेळी धर्मानंद गायकवाड़ जिल्हा संपर्क प्रमुख , तानाजी गायकवाड , नरेश गायकवाड उपाध्यक्ष रायगड जिल्हा , हिरामण भाई गायकवाड तालुका अध्यक्ष कर्जत , अलका सोनावणे महिला ता. अध्यक्ष , अक्षता गायकवाड ता. उपाध्यक्ष , दिनेश गायकवाड ता. कार्याध्यक्ष , अमर जाधव ता.युवा अध्यक्ष , वैशाली महेश भोसले कर्जत शहर अध्यक्ष महिला , अनंता खंडागळे ता. महासचिव , भालचंद्र गायकवाड ता. संघटक , प्रकाश गायकवाड ता.उपाध्यक्ष , प्रफुल ढाले ता.उपाध्यक्ष , अंकुश सुरवशे ता. उपाध्यक्ष , जगदिश शिंदे ता.उपाध्यक्ष किशोर गायकवाड ता.उपाध्यक्ष , दिपक गायकवाड ता.उपाध्यक्ष , विकास गायकवाड ता.सह सचिव , जिवक गायकवाड ता.सह सचिव, गौतम ढोले , संदीप गायकवाड उमरोली जि.प. वार्ड अध्यक्ष ,प्रविण गायकवाड उमरोली पं. समिती वार्ड अध्यक्ष , सुरेखा कांबळे नेरळ शहर अध्यक्ष महिला , अशोक गायकवाड , प्रेमनाथ जाधव , विजय गायकवाड , अमित गायकवाड , शशिकांत उबाळे , विशाल गायकवाड त्याचप्रमाणे अनेक आरपीआय पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page