आदिवासी वाड्यांवर दिवाळी साजरी करून विश्व हिंदू परिषदेचा हातभार !

0
68

भिसेगाव-कर्जत (सुभाष सोनावणे) कोरोना संसर्ग महामारीमुळे हरवलेली नाती पुन्हा एकदा एकमेकांत मिसळू लागली आहेत. दोन वर्षांच्या कालावधीत सण – उत्सव साजरे न झाल्याने आदिवासी वाड्यांवर चिल्या – पिळयांच्या संगतीत आनंदोत्सव साजरा करण्यासाठी दीपावलीच्या सणात विश्व हिंदू परिषद ( धर्म प्रसार विभाग ) यांनी मदतीचा हात पुढे करत दिवाळी फराळाचे वाटप कर्जत तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यांवर जाऊन करण्यात आले.

विश्व हिंदू परिषद ( धर्म प्रसार विभाग ) यांच्या माध्यमातून समरसता व सेवाभाव या वृत्तीने संपूर्ण रायगड जिल्ह्यातील १७००० हजार आदिवासी कुटुंबाना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. कर्जतमधे ४० ( चाळीस ) आदिवासी वाड्यांवर २१०० कुटुंबाना दिवाळी फराल वाटप करण्यात आले . त्यामुळे त्यांची दिवाळी गोड झाली आहे.

तर चिल्या – पिळयांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.या करीता कर्जत प्रखंडातील विश्व हिंदू परिषदेचे दिनेश रणदिवे , विशाल जोशी , अनंता हजारे , महेश बड़ेकर , रमेश नाईक , वसंत महाडिक , अनिल कडव , दशरथ वाघमारे , ऍड . दिपक डावरी , ऍड .अविनाश बैलमारे , सुनील मोरे व बजरंग दलाचे कुलाबा जिल्हा संयोजक साईंनाथ श्रीखंडे यांनी आदिवासी वाड्यांवर जाऊन आदिवासी कुटुंबाना फराळ वाटप केले व त्यांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.