Friday, February 7, 2025
Homeमहाराष्ट्ररायगड" आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे ख्रिसमस "…

” आनंदाचा आणि उत्साहाचा सण म्हणजे ख्रिसमस “…

कर्जतमध्ये ” ख्रिसमस ” मोठ्या उत्साहात साजरा !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )सर्व धर्म समभाव चे प्रतिक असलेला ” ख्रिसमस ” हा सण आनंदाचा आणि उत्साहाने सर्वत्र साजरा होतो . हा ख्रिश्चन धर्मीयांचा प्रमुख सण असून तो दरवर्षी २५ डिसेंबरला जगभरात साजरा केला जातो. ख्रिसमसच्या निमित्ताने चर्चमध्ये प्रार्थना सभांचे आयोजन केले जाते, गाईंच्या गोठ्यात येशूंची प्रतिमा ठेवून त्यांना नमन केले जाते. हा सण केवळ ख्रिश्चन धर्मीयांपुरता मर्यादित नसून सर्व धर्मीय एकत्र येऊन तो साजरा करतात. हा सण प्रेम, शांती, आणि आपुलकीचा संदेश देतो. अनेक वर्षांपासून कर्जतमध्ये २४ डिसेंबर रोजी मध्यरात्री कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव येथील ” द श्राईन ऑफ अवर लेडी ऑफ फातिमा ” या फातिमा मातेच्या चर्चमध्ये ख्रिसमस निमित्त पवित्र प्राथना साजरी करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाची सुरुवात कॅरोल गाण्यांनी झाली. कर्जत धर्माप्रांता चे ” धर्मगुरू ज्यो डिमेलो ” यांनी ख्रिसमसच्या महत्त्वावर एक सुंदर प्रवचन दिले. त्यांच्या सोबत फादर ब्रायन बुतेलो , फादर किरण , फादर सिल्वेस्टर रेगो , बीरमार्क फर्नांडिस , जीजो एस व्ही डी . आदींनी देखील सर्वांसाठी प्रार्थना केली .

यावेली ॲड. अँथनी डिमेलो, सायमन कजार, व्हिक्टर मस्केअरन्हस , सुरेंद्र अंची, सेविओ फ्रान्सिस, विल्सन पानपाटील, नेल्सन, सेविओ कॉलासो, स्पन्सर डिसोझा, सिल्वेस्टर फ्रान्सिस, संगीता, साधना, अगनेस, जेम्स डिमेलो, रुबी फर्नांडिस आणि स्तेफी फ्रान्सिस यांनी आणि इतर अनेक भाविकांनी या क्रिस्तज्यंती मिसाबलिदानात सहभाग घेतला.
- Advertisment -

You cannot copy content of this page