Saturday, November 2, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" आमचं ठरलय , या निवडणुकीत आमदार आम्हीच होणार "…

” आमचं ठरलय , या निवडणुकीत आमदार आम्हीच होणार “…

भाजपचे उमेदवार ” मराठा चेहरा ” विधानसभा अध्यक्ष ” किरण भाऊ ठाकरे ” यांचा उमेदवारी अर्ज दाखल !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत विधानसभा मतदार संघात गेली अनेक वर्षे ” भारतीय जनता पक्ष ” मित्र पक्षाला सहकार्य करत आले आहेत . ” सत्तेचा वाटा ” कधीच न घेणारे भाजप आत्ता चक्क राज्यात महायुतीतील शिवसेनेला उमेदवारी दिलेली असताना देखील कर्जत विधानसभा अध्यक्ष किरण भाऊ ठाकरे यांनी हजारो भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते , महिला आघाडी तसेच प्रचंड जनसमुदाय घेवून भव्य रॅली काढून ढोल ताशांच्या गजरात , घोषणा देत आज सोमवार दिनांक २८ ऑक्टोंबर २०२४ रोजी उमेदवारी अर्ज प्रशासकीय भवन कर्जत येथे निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर केला . विशेष म्हणजे या भव्य रॅलीत भाजपाचे अनेक कार्यकर्ते कमळ सिंबोल लावून , पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, मंत्री रविंद्र चव्हाण यांचे पोष्टर लावून भाजपाचे कमळ मफलर घालून सामील झाले असल्याने ” आमचं ठरलंय ” हे कर्जत मतदार संघात ” उरण पॅटर्न ” राबवून पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरणार व ” आम्हीच आमदार होणार ” , व बदल घडविणार हे भाजप विधानसभा अध्यक्ष किरण भाऊ ठाकरे यांचे वाक्य खरे होणार की काय ? असेच काहीसे चित्र येथे दिसत होते , यामुळे आता ” काटे की टक्कर ” या मतदार संघात पहाण्यास मिळणार आहे.

भाजपचे मंत्री ” रविंद्रजी चव्हाण साहेब ” यांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यात भरघोस निधी आणून भाजप विधानसभा अध्यक्ष किरण भाऊ ठाकरे यांनी विकास कामांचा ” झंझावात ” सुरू करून आपण यावेळी निवडणुकीत उतरणार हे जाहीर केले होते .त्या पद्धतीने त्यांची व्यूहरचना तयार करून भाजपात अनेक तरुण कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम देखील मोठ्या प्रमाणात घडत होते . गेली अनेक वर्षे विधानसभेच्या निवडणुकीत ” ईव्हीएम ” मशीनमध्ये भाजपची निशाणी ” कमळ ” नसल्याने कार्यकर्त्यांना चुकल्या सारखे वाटत होते . आपली निशाणी कधी येणार , अशी चर्चा होत असताना तरुण तडफदार उमेदवार म्हणून विधानसभेचे अध्यक्ष किरण भाऊ ठाकरे हे ” दंड ” थोपटून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार ” निवडणूक लढणार व निवडूनही येणार ” , अशी ” भीष्म गर्जना ” त्यांनी केली , त्यांच्या या निर्णयाने भाजप कार्यकर्त्यांत उत्साह बळावला होता . मात्र ते आज सत्यात उतरले.

या मतदार संघात महायुतीत आलबेल असून सर्वच मित्र पक्षातील येथील नेते निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत व निवडणूक अर्ज भरले आहेत . यामुळे मतांची विभागणी होवून भाजपच्या आता वाढलेल्या मतांवर त्यांचा ” विजयी ” निश्चित मानला जात आहे . भारतीय जनता पक्षाचे कर्जत खालापूर मतदार संघाचे अध्यक्ष किरण ठाकरे हा ” मराठी चेहरा ” गेली अनेक वर्षांपासून जनतेच्या सुख दुःखात असून ” हेल्प लाईन ” च्या माध्यमातून त्यांनी नागरिकांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिले आहेत . ” फक्त फोन करा , किरण ठाकरे हजर होणार ” , या त्यांच्या स्तुत्य उपक्रमामुळे ” जनता जनार्धन ” देखील त्यांच्या या कार्यावर खुश होवून अनेक तरुणाई भाजप पक्षात पक्ष प्रवेश केले आहेत .
हिंदू धर्मीय अनेक सण , उत्सव , कार्यक्रमात त्यांचा हातखंडा असून सर्वांच्या पुढे राहून आंदोलने , मोर्चात सहभागी होत होते . सार्वजनिक बांधकाम मंत्री नाम . रविंद्र चव्हाण हे त्यांचे ” गॉडफादर ” असल्याने त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी करोडो रुपयांचा निधी या मतदार संघात आणून गावागावांत विकास केला . त्यामुळे सर्व सामान्य जनतेच्या नजरेत ते आले . श्री गणेशोत्सव कार्यक्रमात त्यांनी अनेक स्पर्धा ठेवून बक्षिसे वाटून सर्वांचीच मने जिंकली तर रस्ते , आरोग्य , आरोग्य शिबीर , रक्तदान शिबिर , अँब्युलन्स सेवा , शैक्षणिक मदत , होतकरू तरुण – सामाजिक क्षेत्रात काम करणारे नागरिक – सर्प मित्र – महिला भगिनी यांचा सन्मान , हेल्प लाईन सेवा , शेतकरी बांधवांना मदत , भाजपाचे रस्ते आंदोलन , मोर्चे , निषेध मोर्चे , विविध कार्यक्रमात त्यांची उपस्थिती अग्रगण्य असल्याने येणाऱ्या काळात त्यांचा चेहरा भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सर्वदूर पसरला . ” हिच ती वेळ आहे ” , हे त्यांनी हेरले , या निवडणुकीत आपण जर उमेदवारी लढवल्यास भाजपची मते त्यांना नक्कीच मिळतील , व इतर मतदारांच्या मतांवर आपण निवडून येवू व सर्वांचे स्वप्न साकार होवून येथील आमदार उरण पॅटर्न राबवून आपणच होणार , अशी ठाम विश्वास त्यांचा असल्याने कार्यकर्त्यांची साथ त्यांच्या पाठीशी आहे , म्हणूनच त्यांनी निवडणुकीचे ” बिगुल ” वाजवून आज मोठ्या संख्येने भव्य रॅली काढून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

कर्जत खालापूर मतदार संघात भाजपा आपली ” ताकद ” अजमावणार व ” उरण पॅटर्न ” राबवून निवडून येणार , असेच काहीसे हे संकेत असून ” अभी नहीं तो कभी नहीं ” असा सूर भाजप विधानसभा अध्यक्ष किरण भाऊ ठाकरे यांच्या शब्दात असल्याने वरिष्ठ पातळीवर महायुतीत कुठलीही बोलणी झाली तरी ” मी निवडणूक लढणारच व निवडूनही येणारच ” , अशी भीष्म गर्जना भाजप अध्यक्ष किरण भाऊ ठाकरे यांनी यापूर्वीच केली आहे . यानिमित्ताने भाजप कित्येक वर्षानंतर या विधानसभेमध्ये निवडणूक लढणार व ईव्हीएम मशीनमध्ये भाजप चे कमळ फुलणार का ? याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे , मात्र या उमेदवारीच्या निमित्ताने भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आज दिसण्यात आला .
- Advertisment -

You cannot copy content of this page