Tuesday, May 30, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडआमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या कार्यप्रणालीचा तरुण कार्यकर्त्यांवर छाप , अनेकांचा पक्षप्रवेश !

आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या कार्यप्रणालीचा तरुण कार्यकर्त्यांवर छाप , अनेकांचा पक्षप्रवेश !

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत – खालापूर मतदार संघात फक्त कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून ” बाळासाहेबांची शिवसेना ” या पक्षांचीच जोरदार घौडदौड सुरू असून त्यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत व त्यांच्या ठोस निर्णयावर आकर्षित होत अनेक तरुण वर्ग पक्षप्रवेश करत आहेत . आज ” शिवतीर्थ ” पोसरी येथे अनेक कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना – शिंदे गटात प्रवेश केला.
त्यामुळे आगामी काळात महेंद्रशेठ थोरवे यांचे हात मजबूत झाले असून खालापूर तालुक्यात त्यानिमित्ताने ” भगवे वादळ ” उठलेले दिसून येत आहे.आज रविवार दि. १२ फेब्रुवारी २०२३ रोजी पोसरी येथील शिवतीर्थ कार्यालयात ” बाळासाहेबांची शिवसेना ” पक्षाचे तरुण – तडफदार व महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या कार्याचा वारू चाहुबाजूने उधळत असून इतर पक्षातील अनेक कार्यकर्ते शिवसेना – शिंदे गटात पक्षप्रवेश करत आहेत.
” शिवतीर्थ ” हे कार्यालय नेहमीच यामुळे चर्चेत असून आगामी काळात सर्वत्र भगवे वातावरण दिसणार असेच काहीसे चित्र सध्या दिसत आहे.आज ” शिवतीर्थ ” येथे खालापूर नगरपंचायत हद्दीतील खडकआळी येथील भालचंद्र भोसले, शैलेश भोसले, अजय दिघे, साहिल सावंत या प्रमुखांसह अनेक ग्रामस्थांनी ” बाळासाहेबांची शिवसेना ” पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी गटनेते किशोर पवार , तालुका अधिकारी रोहित विचारे , शहर अधिकारी अमित जगताप , उपशहर प्रमुख दीपक पाटील , हरीश मोडवे , मयुरेश निधी त्याचप्रमाणे विभागातील पदाधिकारी, व शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

You cannot copy content of this page