![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(!empty($image5)); {?>
![]()
} ?>
शेलू ग्रामपंचायत हद्दीत अवतरणार पाणी योजना !
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) -कर्जत तालुक्यातील रेल्वे पट्ट्यात शेवटची ग्रामपंचायत असलेल्या शेलू हद्दीत पाण्याची टंचाई आता बंद होणार असून नुकतेच कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी येथील पाणी टंचाई संपुष्टात आणण्यासाठी व दळणवळणाची सोय व्हावी , यासाठी रस्त्यांचे भूमिपूजन त्यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत शेलु पाणी योजना राबविल्याने येथील पाणी टंचाईमुळे ग्रामपंचायत हद्द सुजलाम – सुफलाम होणार आहे . शेलू ग्रामपंचायत हद्दीत नागरीकरण झपाट्याने वाढत असल्याने नवनवीन इमारतीचे प्रोजेक्ट वाढत आहेत.अश्यामुळे येथील भूमिपुत्रांना कामे मिळणार असून हि पाणी योजना नवसंजीवनी देणार आहे . एकूण रक्कम १२ कोटी ६ लाख रुपये खर्चून हि शेलू पाणी योजना लवकरच कार्यान्वित होईल.
तर मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अंतर्गत शेलु रेल्वे स्टेशन ते बांधिवली गावापर्यंतच्या रस्त्याचे भूमिपूजन रक्कम ७५ लाख २१ हजार रुपये खर्चून दळणवळणाचा प्रश्न देखील आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी निकाली काढला असून रविवार दि. २३ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ११ वाजता शेलू ग्रामपंचायत ऑफिस समोर कर्जत – खालापूरचे आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन कार्यक्रम नुकताच पार पडला . यावेळी आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या समवेत माजी सभापती अमर मिसाळ , भाजपाचे ता.अध्यक्ष मंगेश म्हसकर , शिवाजी खारीक , त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सरपंच , सदस्य , शिवसेना , भाजप पदाधिकारी , शिवसैनिक , कार्यकर्ते , महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.