if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) महाराष्ट्रात ” दहीहंडी ” उत्सवाला अनन्य साधारण महत्व आहे . बाळ गोपाळ व तरुण वर्ग यासाठी तीन महिने सराव करून दहीहंडी फोडण्यासाठी ” चित्त थरारक मानवी मनोरे ” उभे करून ” हम भी कूछ कम नहीं ” , असे दाखवून बक्षिसांचे मानकरी ठरतात . महाराष्ट्राची हि ” उत्सवाची पर्वणी ” कर्जत मध्ये देखील सर्वाँना अनुभवास व पाहण्यास मिळावी , व सणांचे महत्व ” अबाधित ” राहून ” संस्कृतीचे ” जतन व्हावे , याचे पुरेपूर लक्ष आपल्या मतदार संघात देणारे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या ” आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन व शिवसेना कर्जत शहराच्या ” वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील मानाची लाखों रुपयांची दहीहंडी उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे.
चित्त थरारक मानवी मनोरे , त्यावर दहीहंडी फोडणारा बाळ गोपाळ , दहीहंडी फोडण्याचा रोमहर्षक थरार , नामचीन मान्यवरांची एन्ट्री , संगीत – सुरांचा ताल , तर सिने अभिनेते , शिवसेनेचे आमदार महेंद्र शेठ थोरवे व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत कर्जतमध्ये लाखाची दहीहंडी उत्सव मंगळवार दि. २७ ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी ४ – ०० वाजता , रॉयल गार्डन शेजारील मैदान कर्जत – रायगड येथे आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन व शिवसेना कर्जत शहर यांनी आयोजित केला आहे.
यासाठी प्रथम पारितोषिक (खुले) रु. १,२५०००/- व आकर्षक सन्मानचिन्ह , कर्जत तालुका मर्यादित पारितोषिक रू. १,११०००/- व आकर्षक सन्मानचिन्ह , सहा थरांच्या सलामीसाठी गोविन्दा पथकांना १०,०००/- रू. व सन्मानचिन्ह , पाच थरांच्या सलामीसाठी ( कर्जत तालुका ) – रू. ८,०००/- व सन्मानचिन्ह , तर पुरुष व महिलांसाठी ” लक्की ड्रॉ चा खजिना ” असणार त्यात पुरुष लकी ड्रॉ प्रथम पारितोषिक एल ई डी स्मार्ट टिव्ही , द्वितीय पारितोषिक अँड्रॉइड स्मार्ट मोबाईल , तर तृतीय पारितोषिक गेअर सायकल तसेच महिला लकी ड्रॉ मध्ये प्रथम पैठणी साडी , द्वितीय मिक्सर , व तृतीय इलेक्ट्रोनिक इस्त्री अशी बक्षिसांची पर्वणी असून सोबत दहीहंडी बघण्यास येणाऱ्या नागरिकांसाठी राजा आदईकर प्रस्तुत ऑर्केट्रा ” ओम साईराज ” मराठी व हिंदी गाण्यांचा अनोखा नजराणा असणार आहे . या दहीहंडी उत्सवात प्रमुख आकर्षणे क्रांती रेडकर – सिने अभिनेत्री , विनायक माळी – यु ट्यूबर , अक्षता पाटील – रिल्स स्टार असा त्रिवेणी संगम कर्जतकर नागरिकांना पहाण्यास मिळणार आहे.
दरवर्षी मुंबई , ठाणे जिल्हा , पनवेल , नवी मुंबई , उरण , खोपोली , कर्जत तर रायगड जिल्ह्यातून अनेक गोविन्दा पथक येथे येत असतात . अधिक माहितीसाठी संपर्क – 8108602912 , 8888182079 ,9730933786, 8007543999 करा व या चित्त थरारक मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकांचा थरार ” याची देही – याची डोळा ” बघण्यासाठी बाळ गोपाळ , महिला वर्ग व कर्जत तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे , असे आवाहन आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशन व शिवसेना कर्जत शहर पदाधिकारी यांनी केले आहे.