Saturday, December 7, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी बजावला मतदानाचा अधिकार "…

” आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी बजावला मतदानाचा अधिकार “…

मोठ्या मताधिक्याने ” विजयी ” होणार असल्याचे ” भाकीत ” केले व्यक्त !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जत – खालापूर मतदार संघाचे महायुती शिवसेनेचे उमेदवार कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी लोकशाहीच्या मंदिरात आज मतदानाचा हक्क बजावला. आपल्या प्रभागातील पोसरी – तिवरे येथील प्राथमिक शाळेत सकाळीच त्यांनी कार्यकर्त्यांच्या समवेत जाऊन स्वतः उमेदवार असूनही मतदान करून देशव्यापी कार्य केले .

मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील ” बलशाली महाराष्ट्र ” घडविण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट होऊ या . मतदान हा आपला ” हक्कच ” नव्हे तर ” कर्तव्य ” ही आहे , याची जाणीव ठेवून प्रत्येकाने आपले मत नोंदवावे , असे सर्व मतदारांना आवाहन करत २०१९ साली झालेल्या निवडणुकीत १८ हजारांच्या मताधिक्याने विजयी झालो होतो , आता या निवडणुकीत कार्यकर्त्यांचा उत्साह द्विगुणित असून त्या पेक्षाही जास्त मताधिक्याने महायुतीचे उमेदवार म्हणून माझा म्हणजेच विकास कार्याचा ” विजयी ” होणार , असल्याचे भाकीत आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी व्यक्त केले .
- Advertisment -

You cannot copy content of this page