दामत येथील राष्ट्रवादी व ठाकरे सेनेचे अनेक कार्यकर्ते शिवबंधनात !
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत तालुक्यात कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या ” विकास कार्याचा वारू ” सर्वत्र उधळत असून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज दामत येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश करून ” शिव बंधन ” बांधले . आज क्रांती दिनाचे औचित्य साधून दि. ९ ऑगस्ट २०२४ रोजी ” बाळासाहेब भवन ” , शिवसेना जनसंपर्क कार्यालय – कर्जत येथे पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत नेरळ जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायत दामत मधील ” तौसीफ नजे ” यांच्या नेतृत्वाखाली अनेकांनी पक्ष प्रवेश केला.
याप्रसंगी बोलताना आपण कर्जतच्या विकासामध्ये सर्व धर्मीयांचे योगदान हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण आज पक्षात प्रवेश करत आहात आपल्याला योग्य तो मानसन्मान दिला जाईल व आपली सर्व विकास कामे पूर्ण केले जातील , असा शब्द आमदार महेंद्र शेठ थोरवे यांनी दिला , तसेच ममदापूर पासून दामत भडवल कडे जाणारा रस्ता जवळजवळ दीड कोटी रुपये , ममदापूर येथील शंभर वर्षे जुनी शाळा ७० लाख रुपये मंजूर करून दिले . त्या शाळेचे काम प्रगतीपथावर असून दामत येथील उर्दू शाळेला एक कोटी रुपयांची मागणी केली गेली , त्यातील ५० लाख रुपये आज मंजूर झाले व पन्नास लाख रुपये लवकरच मंजूर करण्याचे आश्वासन त्यांनी दिले . ” आमदार महेंद्र शेठ थोरवे म्हणजे विकास ” , हे चित्र याप्रसंगी दिसण्यात आले.
याप्रसंगी रायगड जिल्हा प्रमुख संतोष शेठ भोईर , उपतालुका संघटक सुभाष मिनमीने , नेरळ शहर प्रमुख प्रभाकर देशमुख , नेरळ शहर संघटक केतन पोद्दार, किशोर घारे , अजगर खोत , अबित खोत तसेच शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी व शिवसैनिक यावेळी उपस्थित होत.