Friday, September 20, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडआमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या " कर्तुत्वाला " पुन्हा एकदा आला "...

आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या ” कर्तुत्वाला ” पुन्हा एकदा आला ” बहार “…..

नंदनवन भव्य नोकरी मेळाव्यातून अनेकांना रोजगार बहाल !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कोरोना काळात बेरोजगार झालेल्या तरुण तरुणींना रोजगार देण्याचे ” स्वप्न ” उराशी बाळगून एक ” भव्य दिव्य नोकरी मेळावा ” आयोजित करण्याचा संकल्प कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे होते . यासाठी योग्य नियोजन करून कायमस्वरूपी रोजगार देण्याचे केंद्र त्यांच्या संकल्पनेतून शिवतीर्थ पोसरी – कर्जत येथे साकारण्यात आले असून त्यासाठी ९५ नामांकित कंपन्या यांत समाविष्ट केल्या आहेत .

आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या संकल्पनेतून ” आमदार महेंद्र शेठ थोरवे फाउंडेशनच्या ” माध्यमातून कर्जत – खालापूर मतदार संघात घेण्यात आलेल्या ” नंदनवन नोकरी मेळाव्याच्या ” निमित्ताने ” युवा हब स्किल मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड ” संचालक किरण राहणे व दीपक पवार यांच्या माध्यमातून एकूण ९५ कंपन्यांनी या मेळाव्यासाठी रजिस्ट्रेशन केलेले होते. त्यापैकी पहिल्या शिफ्टमध्ये ६५ कंपन्या व दुसऱ्या शिफ्ट मध्ये ३० कंपन्यांनी सहभाग नोंदवला . यामध्ये बजाज, महिंद्रा , टाटा मोटर्स , पेटीएम , कोटक, आयसीआयसीआय , झेप्टो लिंक , लेन्स कार्ड , हॉस्पिटल केअर , या नामांकित कंपन्या सहभागी होत्या. सदर मेळाव्यासाठी २६७० ऑनलाइन युवकांनी आपली नोंदणी पूर्ण केली , त्यापैकी २२०० लोकांनी प्रत्यक्ष मुलाखत पूर्ण केली . या मुलाखतीमधून ११७८ जणांना नियुक्तीपत्र देण्यात आले , व ५४० तरुण – तरुणींना कंपनीमध्ये सेकंड इंटरव्यू साठी बोलवण्यात आले , व त्यापैकी ५५२ बेरोजगारांना ” जॉब कार्ड ” देण्यात आले.

यामध्ये विशेषत्वाने ” दिव्यांग बांधवां ” पैकी तीन दिव्यांग बांधवांना दोन लाख रुपये पगाराची नोकरी देण्यात आली , तसेच आयटी क्षेत्रामध्ये डॉट नेट डेव्हलपर म्हणून सात लाख रुपये किमतीचे पॅकेज एका विद्यार्थ्याला देण्यात आले. भव्य दिव्य मंडपात रविवार दिनांक १८ ऑगस्ट २०२४ रोजी साकारण्यात आलेला हा ” अलौकानिय नंदनवन नोकरी मेळावा ” , अनेकांना ” संजीवनी ” ठरला असून , ” आमदार साहेब , नाद नाही तुमचा ” असेच सर्व रोजगार मिळालेले तरी तरुणींच्या मुखातून ” गौरोदगार ” निघाले असून सर्वांनी कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे आभार व्यक्त केले आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page