आमदार शेळके यांच्या उपस्थितीत लोणावळा नगरपरिषद हद्दीतील विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन समारंभ संपन्न…

0
268

लोणावळा दि.1 : लोणावळा नगरपरिषद हद्दीतील विविध विकास कामांचा लोकार्पण व भूमिपूजन समारंभ आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

लोणावळा शहरातील पूर्ण झालेल्या भांगरवाडी विभागातील शितल सुपर मार्केट ते साईबाबा मंदिर ते फाटक जिम व अंतर्गत रस्ते . साईबाबा मंदिर ते मारुती मंदिर , धनलक्ष्मी मोबाईल शॉप ते महालक्ष्मी जनरल स्टोअर्स व श्री टूर्स रचना गार्डन महावितरण ऑफिस , प्रशांत सुपर मार्केट ते महालक्ष्मी जनरल स्टोअर्स याठिकाणी ओक्टेगोनल स्ट्रीट लाईट पोल अंडरग्राउंड केबल वापरून उभारणे, मुंबई पुणे महामार्ग पासून शिवशक्ती सोसायटी ते खत्री पार्कपर्यंत अंडरग्राउंड केबल वापरून स्ट्रीट लाईट पोल उभारणे, रायवुड परिसरातील भोमे वस्ती वनराई सोसायटी पर्यंत जाणारा रस्ता , लाल टाकी परिसर येथे अंडरग्राउंड केबल वापरून लाईट पोल उभारणे,

गावठाण रेल्वे गेट नं .29 ते एनएच 4 पर्यंत स्ट्रीट लाईट पोल उभारून त्यास भूमिगत केबल टाकून स्ट्रीट लाईट व्यवस्था करणे,जुना खंडाळा दाभाडे टपरी ते रेल्वे गेट नं.30 पर्यंत स्ट्रीट लाईट पोल उभारून त्यास भूमिगत केबल टाकून स्ट्रीट लाईट व्यवस्था करणे,वलवण व्हिलेज रिसॉर्ट ते ओल्ड एज होम अंतर्गत रस्ते येथे अंडर ग्राउंड केबल वापरून स्ट्रीट लाईट पोल उभारणे, नांगरगाव इंडस्ट्रियल इस्टेट ते नांगरगाव आयटीआय पर्यंत व दिव्या हिलटॉप रस्ता सौर पथदिवे व स्ट्रीट लाईट पोल उभारणे इत्यादी कामांचा लोकार्पण तसेच जुना खंडाळा येथील महादेव मंदिर ते जय मल्हार वसाहत पर्यंतचा रस्ता सुधारणा करणे,मातृछाया ते राजगोल पार्क सोसायटी पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, मलशुद्धीकरण प्रकल्प केंद्राकडे जाणारा डोंगरगाव ग्रामपंचायत हद्दीतील रस्ता डांबरीकरण करणे,नांगरगाव औद्योगिक वसाहत अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे, हनुमान मंदिर ते सरस्वती टॉकीज पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे, भांगरवाडी विभागातील सिद्धिविनायक सोसायटी ते काळे हॉस्पिटल ते रचना गार्डन वरून पुढे ममता जनरल पर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे,

भांगरवाडी विभागातील लोहगड उद्यान ते सुजल पार्क व या रस्त्यास जोडणारे सर्व अंतर्गत रस्ते डांबरीकरण करणे इत्यादी पूर्ण झालेल्या विविध विकास कामांचा लोकार्पण तसेच नांगरगाव बारा बंगला रोड गुरुकृपा मार्ग रस्त्यावर भूमिगत केबल वापरून स्ट्रीट लाईट पोल उभारणे,टाटा डकलेन न्यू इंदिरानगर ते सफायर हॉटेल रस्त्यावर भूमिगत केबल वापरून स्ट्रीट लाईट पोल उभारणे, न्यू तुंगार्ली इंदिरानगर डॉन बॉस्को स्कूल रस्त्यावर भूमिगत केबल वापरून स्ट्रीट लाईट पोल उभारणे, नांगरगाव स्वामी भवन ते महावितरण कार्यालय रस्त्यावर भूमिगत केबल वापरून स्ट्रीट लाईट पोल उभारणे,नांगरगाव आदर्श कॉलनी मधील रस्त्यावर भूमिगत केबल वापरून स्ट्रीट लाईट पोल उभारणे, नांगरगाव नक्षत्र सोसायटी रस्त्यावर व शंकर मंदिर ते आगवाली चाळीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भूमिगत केबल वापरून स्ट्रीट लाईट पोल उभारणे, तुंगार्ली विभागातील मुख्य रस्ता सर्वे नं 35 पासून सर्वे नं . 40 पर्यंतचा विकास योजनेतील रस्ता डांबरीकरण करणे,

येथील नवीन पाण्याच्या टाकी पासून सर्वे नं . 34 पर्यंत व तेथून सर्वे नं . 44 पर्यंतचा विकास योजनेतील रस्ता डांबरीकरण करणे, वलवण येथील जावळेकर वस्ती येथे गटर बांधकाम करणे इत्यादी विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत व लोणावळ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आजी माजी पदाधिकारी यांच्या हस्ते नारळ वाढवून संपन्न झाला.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस चे कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.