Friday, June 2, 2023
Homeपुणेवडगावआमदार सुनील शेळके यांची तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या वीकासकामांबाबत आढावा बैठक संपन्न !

आमदार सुनील शेळके यांची तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या वीकासकामांबाबत आढावा बैठक संपन्न !

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीं अंतर्गत सुरू असलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी आज वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहात ग्रामपंचायत आढावा बैठकीचे आयोजन केले होते .

यावेळी मावळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुधीर भागवत ,मावळातील सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच , उपसरपंच , ग्रामसेवक तसेच सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आमदार सुनिल शेळके यांनी मागील दोन वर्षांमध्ये तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील गावांच्या सर्वांगीण विकासासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून घेतला आहे . या निधीच्या माध्यमातून गावांमध्ये सुरू असलेल्या व रखडलेल्या विकास कामांचा आढावा आमदार सुनिल शेळके यांनी शुक्रवारी आयोजित केलेल्या ग्रामपंचायत आढावा बैठकीत घेतला . तालुक्यातील अनेक गावांमधील रस्ते , अंगणवाडी , शाळा , स्मशानभूमी , ग्रामपंचायत कार्यालये , नळ पाणी पुरवठा योजना , आदि कामांसाठी निधी उपलब्ध असून देखील कामे रखडली आहेत,तर काही कामे संथ गतीने करत असताना येणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी या आढावा बैठकीत चर्चा करण्यात आली . तसेच जागे अभावी रखडलेल्या कामांसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी आमदार शेळके यांनी सरपंच व उपसरपंच यांना दिल्या आहेत .

तालुक्यातील विविध गांवांसाठी एकूण 40 पाणंद रस्ते मंजूर झाले असून , पाणंद रस्त्यांची कामे 1 मे पासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी दिली आहे .

You cannot copy content of this page