Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" आम आदमी पार्टीच्या पाठिंब्याने सुधाकर भाऊ घारे यांचे हात बळकट "…

” आम आदमी पार्टीच्या पाठिंब्याने सुधाकर भाऊ घारे यांचे हात बळकट “…

१५ ते २० हजारांचे मताधिक्य देणार – प्रदेश संघटन सचिव रियाज पठाण..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत मतदार संघात विकास कार्य करणारा , ” सक्षम व दमदार ” आमदार होण्यासाठी आम आदमी पक्षाचे पक्ष प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या निर्णयानुसार या मतदार संघातील कार्य कुशल नेतृत्व म्हणून परिचित असलेले राजिपचे मा. उपाध्यक्ष तथा परिवर्तन आघाडीचे उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांना या निवडणुकीत बिनशर्त जाहीर पाठिंबा असल्याचे मत आम आदमी पक्षाचे प्रदेश संघटन सचिव रियाज पठाण यांनी आज पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

आज शुक्रवार दिनांक १ नोव्हेंबर २०२४ रोजी परिवर्तन आघाडीचे कर्जत विधानसभा मतदार संघाचे उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांच्या संपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते . यावेळी डॉक्टर रियाज युसूफ पठाण – महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव , चंद्रप्रकाश उपाध्याय – सचिव खालापूर तालुका , गॅसूद्दीन खान – खोपोली शहर अध्यक्ष , विवेक दयानंद वाघमारे – खोपोली शहर उपाध्यक्ष या प्रमुख पदाधिका-यांच्या समवेत आम् आदमी पक्षाचे खालापूर तालुक्यातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते . यावेळी प्रदेश सचिव रियाज पठाण पुढे म्हणाले की , या मतदार संघात फक्त सुशोभीकरण करणे म्हणजे विकास नाही , तर येथील बेरोजगार तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे . खालापूर तालुक्यात मोठी इंडस्ट्रीज असून देखील येथील नेतृत्वाने बेरोजगारी दूर केली नाही . आज खोपोली घाटात अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांवर योग्य उपचार लवकर होत नसल्याने ते मृत्यू होत आहे , म्हणूनच अत्याधुनिक ” हॉस्पिटल व ट्रामा सेंटर ” ची येथे गरज असताना येथील आमदारांनी ते उभारणे गरजेचे होते , पण तसा विकास झाला नाही , म्हणूनच आम् आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांच्या निर्णयानुसार आम्ही येथील योग्य विकास साधणारे , सक्षम व दमदार परिवर्तन आघाडीचे उमेदवार राजिपचे मा. उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांना जाहीर पाठिंबा दर्शविला आहे.

आम्ही जोरदार प्रचार – प्रसार करून १५ ते २० हजारांचे मताधिक्य देणार व निवडून आणणार , अशी गर्जना त्यांनी केली . रायगड जिल्ह्यात भाजप व त्यांच्या मित्र पक्षाला सोडून सर्वांना पाठींबा देणार , असल्याचे सांगून महाराष्ट्रात देखील असा पाठींबा असून या जोरावर आम्ही ५० उमेदवारांना निवडून आणणार आहोत . कर्जत – खालापूर मतदार संघातील मतदारांनी देखील ” सच्चा – सक्षम – दमदार ” उमेदवाराच्या मागे उभे राहुन उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांनाच आपली मते देवून मोठ्या मताधिक्याने निवडून द्या , असे आवाहन देखील याप्रसंगी आप चे प्रदेश सचिव रियाज पठाण यांनी केले . या मतदार संघात आप चा मी इच्छुक उमेदवार होतो , मात्र मतांचे विघटन न होण्यासाठी पक्षाध्यक्ष यांनी महाराष्ट्रात यावेळी कुठेच उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला असून या मतदार संघात आमचे ४० हजार सभासद असल्याचे सांगितले.

यावेळी उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांना त्यांनी पाठिंब्याचे पत्र देवून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या . तर आप पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला , या मतदार संघाचा विकास साधण्यासाठी मला योग्य उमेदवार म्हणून पाठींबा दिलात , याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करत आपल्या वरील सर्व संकटे , समस्यात मी आपल्या पाठीशी सदैव उभा आहे , असे आश्वासन याप्रसंगी कर्जत मतदार संघाचे परिवर्तन आघाडीचे उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांनी दिले.
- Advertisment -

You cannot copy content of this page