![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
धर्मानंद गायकवाड व हिरामण भाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कर्जत तालुका एकवटला..
भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी तमाम भारत वासीयांना संविधानाच्या माध्यमातून समता – स्वातंत्र्य – न्याय – हक्क , तसेच हजारो अधिकार बहाल केले . महिलांना देखील चूल व मूल च्या उंबरठ्यातून बाहेर काढले , अंधकारमय जुन्या चालीरीती मोडून गुलामीच्या जोखडातून मुक्त करणारे संविधानाचे महत्व व त्याचा जागर होण्यासाठी या उद्दात हेतूने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) या पक्षाची कर्जत शहारापासून ते ग्रामीण भागात पाळेमुळे खोलवर असल्याने त्या बहुजन वर्ग व आंबेडकरी अनुयायांशी नाळ जुळलेल्या जिल्हा संपर्कप्रमुख धर्मानंद गायकवाड व आंबेडकरी विचारांशी शेवटपर्यंत पाईक राहून आरपीआय पक्षाची धुरा उचलणारे दिवंगत ता.अध्यक्ष किशोर भाई गायकवाड यांची प्रेरणा व निळा झेंडा हाती घेऊन कार्य करणारे कर्जत ता.अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली घोषणा आणि फटाक्यांची आतषबाजीत भव्यदिव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
त्यामुळे कर्जत तालुक्यांत आज आरपीआय (आठवले) पक्षाच्या वतीने २६ नोव्हेंबर रोजी “ संविधान दिन ” निळ्या झंझावाताने मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला.आरपीआय कर्जत ता. अध्यक्ष पदी हिरामण रघुनाथ गायकवाड यांची नियुक्ती राष्ट्रीय पक्षाध्यक्ष , केंद्रीयमंत्री नाम.रामदासजी आठवले साहेब यांनी स्वतः केल्यानंतर आरपीआय पक्ष प्रचंड वाढला आहे, अनेक सामाजिक , लोकोपयोगी व विकासकामे केल्यावर तालुक्यांत बाईक रॅली काढुन संविधान दिनाबाबत जनजाग्रुती करण्यात आली आहे.
आरपीआयचे कोकण प्रदेश अध्यक्ष जगदीशभाई गायकवाड, रायगड जिल्हा संपर्क प्रमुख धर्मानंद गायकवाड, रायगड जिल्हाअध्यक्ष नरेंद्र गायकवाड, रायगड जिल्हा युवक अध्यक्ष प्रमोद महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली या रॅलीचे आयोजन कर्जत आरपीआयचे ता. अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड, महीला आघाडी तालुका अध्यक्ष अलका सोनावणे , कर्जत शहर अध्यक्षा वैशाली महेश भोसले व पदाधिकाऱ्यांनी केले होते.
या रॅलीत महिलांची उपस्थिती मोठ्या संख्येने होती.कर्जत शहरालगत असणाऱ्या हालीवली येथील सिग्नेचर डिझायर संकुल येथुन ही रॅली सुरु झाली, कर्जत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ही रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून थेट डॅा. बाबासाहेब आंबेडकर चौकात पोहोचली , डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करुन ही रॅली कर्जत तालुक्यांतील कडाव , डीकसल , नेरळ अश्या विविध भागात नेणेत आली , यावेळी आरपीआयच्या वतीने जोरदार घोषणाबाजी ,फटाक्यांची आतषबाजीने व निळ्या झंझावाताने संपुर्ण कर्जत तालुक्यात बाईक रॅलीचे उत्साहात स्वागत झाले.
सदरची बाईक रॅली यशस्वी करण्यासाठी आरपीआय कर्जत ता. अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड, ता. कार्याध्यक्ष दिनेश गायकवाड , ता.महासचिव अनंता खंडागळे , युवक अध्यक्ष अमर जाधव, महीला आघाडी ता. अध्यक्षा अलका सोनावणे , महिला संघटक वर्षा चिकणे , ता. संघटक भालचंद्र गायकवाड, ता. उपाध्यक्ष अक्षता गायकवाड, कर्जत महिला शहर अध्यक्षा वैशाली महेश भोसले, नेरळ शहर अध्यक्षा सुरेखा कांबळे, ता. उपाध्यक्ष बबळु ढाले, उपाध्यक्ष प्रकाश गायकवाड, उपाध्यक्ष जगदीश शिंदे, उपाध्यक्ष अंकुश सुरवसे, उपसचिव विकास गायकवाड, अमित गायकवाड, प्रविण गायकवाड, दिपक गायकवाड, संदिप गायकवाड, जिवक गायकवाड यांसह कर्जत तालुक्यांतील आरपीआयचे अनेक पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.