Friday, September 20, 2024
Homeपुणेलोणावळाआरपीआय चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांची पुणे जिल्हा नियोजन समिती...

आरपीआय चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांची पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी नियुक्ती…

लोणावळा : आर पी आय चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांची पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निमंत्रित सदस्य पदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नियोजन यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड करण्यात आली असल्याचे पत्र राज्याचे उपसचिव निभा खेडकर यांनी जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव जिल्हा नियोजन समिती पुणे यांना दिले आहे. जिल्हा नियोजन समितीवर विशेष आमंत्रित म्हणून तीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे यापैकी सूर्यकांत वाघमारे यांची मावळ साठी नियुक्ती करण्यात आली.
सूर्यकांत वाघमारे हे लोणावळा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या या निवडीमुळे लोणावळा शहर व मावळ तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. या पुढील काळामध्ये होणाऱ्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांमध्ये सूर्यकांत वाघमारे हे लोणावळा व मावळ तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहेत. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका शेजारी लोणावळा जागरूक नागरिक यांच्या वतीने सूर्यकांत वाघमारे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विलास बडेकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे अध्यक्ष नासिर शेख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख बाळासाहेब फाटक, माजी उपनगराध्यक्ष भरत हारपुडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते यशवंत पायगुडे,शिवसेना माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे,काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस किरण गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते भरत भरणे, माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर,राष्ट्रवादी युवकचे सरचिटणीस भूषण पाळेकर,मराठा क्रांती मोर्चाचे उमेश तारे, माजी नगरसेवक संजय गायकवाड, माजी शिक्षण मंडळ सभापती जितेंद्र कल्याणजी, ज्ञानेश्वर येवले व संजय अडसुळे, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवक अध्यक्ष अजिंक्य कुटे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव, जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
- Advertisment -

You cannot copy content of this page