आरोग्य केंद्र कार्ला येथील आरोग्य कर्मचारी व अधिकारी यांचा गौरव..

0
156

कार्ला : आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते कार्ला आरोग्य केंद्राच्या अंतर्गत येणारे डॉक्टर , आरोग्य कर्मचारी व आशा वर्कर अशा 57 जणांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले .

संकटावेळी कुठलीही भीती न बाळगता सामान्य जनतेसाठी जो धावून येतो त्याला लोकांचे भरभरून आशीर्वाद मिळतात असे गौरवास्पद उद्गार यावेळी बोलताना आमदार बांगर यांनी केले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम शिवसेना कार्ला शाखेत घेण्यात आला . या कार्यक्रमासाठी हिंगोली मतदार विधानसभा संघाचे आमदार संतोष बांगर , शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे , तालुकाप्रमुख राजेश खांडभोर , कार्ला जिल्हा परिषद आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ भारती पोळ , उद्योजक करीमभाई , तालुका शिवसेना संघटक सुरेश गायकवाड , अंकुश गायकवाड , अंकुश देशमुख , उपतालुकाप्रमुख मदन शेडगे , युवासेना तालुका समन्वयक दत्ता केदारी , विजय तिकोणे , संतोष गिरी , सागर हुलावळे , उपसरपंच किरण हुलावळे , विशाल हुलावळे , चंद्रकांत मडके , सचिन हुलावळे , सनी हुलावळे , सोनाली मोरे , वत्सला हुलावळे , रमेश जाधव , सतीश मोरे , अक्षय हुलावळे , आदेश हुलावळे , तुकाराम हुलावळे , दत्तु हुलावळे , जयवंत येवले आदी मान्यवर उपस्थित होते . कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन भाऊसाहेब हुलावळे यांनी केले होते तर उपस्थितांचे आभार डॉ प्रमोद ठोंबरे यांनी मानले.