Thursday, April 24, 2025
Homeमहाराष्ट्रमुंबईआषाढी एकादशी निम्मित शिशु विहार माध्यमिक विद्यामंदिर शाळेत विठू माऊली चा गजर..

आषाढी एकादशी निम्मित शिशु विहार माध्यमिक विद्यामंदिर शाळेत विठू माऊली चा गजर..

मुंबई – ( श्रावणी कामत ) दादर दिनांक १६ जुलै २०२४ रोजी आषाढी एकादशी निम्मित शिशु विहार माध्यमिक विद्यामंदिर दादर येथे दिंडी काढण्यात आली. या दिंडीत काही विद्यार्थी स्काऊट गाईड युनिफॉर्म तर काही विद्यार्थी आपल्या पारंपरिक वेशात उत्साहाने सहभागी झाले होते.

विठू माऊलीचा गजर करत शाळेच्या परिसरात दिंडी काढण्यात आली या निमित्ताने विद्यार्थ्यांना आषाढी एकादशी चे महत्त्व साऺगून पर्यावरण स्वच्छ ठेवण्यासाठी विद्यार्थ्यी काय काय करु शकतो याबाबतची सजगता पण विद्यार्थ्यांमधे निर्माण करण्यात आली.


दिंडीमध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुचित्रा मॅडम तसेच स्काऊट गाईड शिक्षिका श्रीमती मुग्धा घोगळे, श्रीमती स्नेहा मडावी व श्रीमती अर्चना खारगे शिक्षक सहभागी झाल्या होत्या.

- Advertisment -

You cannot copy content of this page