Saturday, December 7, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडइंजिनियर कॉलेज कर्जत येथे " श्री कोठारी माता रिक्षा चालक-मालक संघटनेची "...

इंजिनियर कॉलेज कर्जत येथे ” श्री कोठारी माता रिक्षा चालक-मालक संघटनेची ” स्थापना !

” अध्यक्ष शरद भाऊ लाड व उपाध्यक्ष बळवंत घुमरे ” यांच्या हस्ते उद्घाटन……

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )रिक्षा चालक मालक यांची एकजूट रहावी व सर्वांनाच व्यवसाय मिळण्याचा फायदा व्हावा , या उदात्त हेतूने कर्जत दहिवली येथील ” इंजिनियर कॉलेज या अभियांत्रिकी महाविद्यालय ” येथे प्रवासी सेवा करणाऱ्या रिक्षा चालक मालक बांधवांनी आज ” श्री कोठारी माता रिक्षा चालक – मालक संघटनेची ” स्थापना करण्यात आली . याप्रसंगी संघटनेच्या फलकाचे अनावरण व उद्घाटन कर्जत नगर परिषदेचे मा. नगराध्यक्ष तथा या संघटनेचे अध्यक्ष शरद भाऊ लाड व कर्जत मधील प्रसिद्ध व्यापारी व प्रगतशील शेतकरी तथा दानशूर व्यक्तिमत्त्व बळवंत घुमरे यांच्या शुभहस्ते करण्यात आले .


यापसंगी श्री कोठारी माता रिक्षा चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष शरद भाऊ लाड यांनी सर्व रिक्षा चालक व मालक यांनी गुण्या गोविंदाने येथे प्रवासी सेवा करावी . येथील अभियांत्रिकी विद्यार्थ्यांना स्वच्छ सेवा देवून सर्वांना सहकार्य करावे , असे मत व्यक्त करत येथे फलक लावण्यास जागा देणारे दानविर व्यक्तिमत्त्व तथा मा. नगरसेवक बळवंत तथा बैजू घुमरे यांचे मनापासून आभार व्यक्त करत सर्व रिक्षा चालक – मालक बांधवांना दिपावलीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या . तर संघटनेचे उपाध्यक्ष बळवंत घुमरे यांनी प्रवासी सेवा सर्व नागरिक विद्यार्थ्यांना देवून आपले कर्तव्य पार पाडत असताना सर्वांना सहकार्य करा , असे आवाहन करून सर्व रिक्षा चालक मालक बांधवांना आज या संघटनेच्या माध्यमातून एकजूट दाखवल्या बद्दल व दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या . यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांचे शाल – श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.


यावेळी श्री कोठारी माता रिक्षा चालक – मालक संघटनेचे अध्यक्ष शरद भाऊ लाड , उपाध्यक्ष बळवंत घुमरे , तर तळ प्रमुख -अरुण रूठे , योगेश लाड , उपतळ प्रमुख – मालू कांबरे , निकेश कांबेरे , राजा लबडे , चिटणीस – सदानंद वाडेकर , सुनिल बैलमारे जाबिर बुबेरे , खजिनदार – बाळा धनवे , विनोद श्रीखंडे , सल्लागार – बाळा लाड , मनोज पाटील , सह सल्लागार – अशोक कोळंबे , दिलीप लोट आदी कमिटी स्थापन करण्यात आली . या सर्व कमिटीचे तळ प्रमुख अरुण रूठे यांनी शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

या स्टँडवरील रिक्षा धारक येथील नागरिक व विद्यार्थ्यांना घेवून कर्जत रेल्वे स्टेशन येथे सोडून पुन्हा याच स्टँड वर व्यवसाय करणार असून या स्टँडवर बाहेरील रिक्षावाल्यांनी कुणीही रिक्षा कॉलेज स्टॅन्डला लावू नये , अगर लावल्यास नंबर दिला जाणार नाही , याची नोंद घ्यावी , असे संघटनेच्या वतीने सांगण्यात आले आहे . या स्टँडवर एकूण ३० रिक्षा चालक मालक बांधव प्रवासी सेवेचा व्यवसाय करत आहेत .
- Advertisment -

You cannot copy content of this page