Sunday, November 27, 2022
Homeमहाराष्ट्रमुंबईइयत्ता 10 ( SSC ) परीक्षेचा निकाल उदया होणार ऑनलाईन..

इयत्ता 10 ( SSC ) परीक्षेचा निकाल उदया होणार ऑनलाईन..

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या शुक्रवारी ता.17 जाहीर होणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.

मार्च – एप्रिल 2022 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र ( इ . 10 वी ) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार उद्या दुपारी 1 वाजल्यापासून ऑनलाईन जाहीर होईल .

पुणे , नागपूर , औरंगाबाद , मुंबई , कोल्हापूर , अमरावती , नाशिक , लातूर आणि कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण पुढील अधिकृत संकेतस्थळांवर उद्या दुपारी 1 नंतर उपलब्ध होतील .

या परीक्षेस 16,38, 964 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती . यापैकी 8,89 , 506 मुले असून मुलींची संख्या 7,49 , 458 एवढी आहे , अशी माहिती देत वर्षा गायकवाड यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत .

- Advertisment -

You cannot copy content of this page