Wednesday, October 16, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडउपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांना आदिवासी बांधवांची अनमोल साथ..

उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांना आदिवासी बांधवांची अनमोल साथ..

ग्रुप ग्रामपंचायत खांडस हद्दीतील आदिवासी वाड्यांत शिवसेना ठाकरे गटाचे भगवे वादळ !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची यशस्वी घौडदौड उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांच्या नेतृत्वाखाली कर्जत मतदार संघात होत असताना दिसत आहे . विशेष म्हणजे आदिवासी बांधवांची अनमोल साथ त्यांना लाभत असून शेकडो आदिवासी बांधव रोजच शिवसेना ठाकरे गटात पक्ष प्रवेश करत आहेत . आज शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी कर्जत तालुक्यातील कळंब जिल्हा परिषद विभागातील ग्रुप ग्रामपंचायत खांडस येथील मौजे मेंगाळवाडी, वडाची वाडी व गावंडवाडी येथील शेकडो आदिवासी बांधवांचा माजी उपतालुका प्रमुख दिनेश भोईर यांच्या पुढाकाराने उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत ” शिवालय ” येथे जाहीर पक्ष प्रवेश झाला.

या पक्ष प्रवेशासाठी व्यासपीठावर उपस्थित उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत, तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, तालुका संपर्कप्रमुख भिवसेन बडेकर, तालुका संघटक बाबू घारे, विधानसभा अधिकारी अ‍ॅड.संपत हडप, माजी तालुका प्रमुख राजाराम शेळके, माजी सभापती पंढरीनाथ राऊत, सोशल मीडिया तालुका प्रमुख रोहित साळोखे, आदिवासी संघटना प्रमुख मालू निरगुडा, माजी विभागप्रमुख माधव कोळंबे, उपतालुका संघटक रवी ऐनकर, कळंब जिल्हापरिषद विभागप्रमुख लक्ष्मण पोसाटे, पाथरज जिल्हा परिषद संघटक संतोष घाडगे, उपतालुका अधिकारी पंकज म्हसे, उपशहर प्रमुख कृष्णा जाधव, खांडपे ग्रामपंचायत प्रमुख जगन्नाथ पायगुडे, रामदास ठोंबरे, अरवंद शाखाप्रमुख संतोष मोडक, पुलाचीवाडी शाखाप्रमुख लहू घाडगे, गणेश हरपुडे, संजय नगर दहिवली, शाखा संपर्कप्रमुख परशुराम लोबो आदी प्रमुखांसह शिवसेना, युवासेना आजी माजी पदाधिकारी व मोठ्या संख्येने आदिवासी समाज बांधव उपस्थित होता.

कळंब जिल्हा परिषद हद्दीतील ग्रुप ग्रामपंचायत खांडस येथील मेंगाळवाडी, वडाची वाडी व गावंडवाडी येथील किशोर मेंगाळ, रमेश बांगारे, सचिन मेंगाळ, रोशन मेंगाळ, योगेश मेंगाळ, दिनेश मेंगाळ, कृष्णा हिंदोळे, अमोल हिंदोळे, एकनाथ मेंगाळ, काळूराम मेंगाळ, मनोहर मेंगाळ, निलेश लोभी, मच्छिंद्र बांगारे, परशुराम हिंदोळे, पांडुरंग लोभी, निवृत्ती खंडवी, भरत लोभी, गोपाळ हिंदोळा, पुंडलिक लोभी, वसंत बांगारे, भरत बांगारे, योगेश भगत, मंगल बांगारे, गणेश वारघडे, पुंडलिक हिंदोळा, किरण गावंड, गणेश गावंड, श्रेयश गावंडा, जयेश गावंडा, विठ्ठल गावंडा, सुरज गावंडा, आकाश वारघडे, लहू वारघडे, धीरज भगत, विलास वारघडे, दुंदा भगत, रामदास गावंडा या असंख्य आदिवासी समाज बांधवांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या कार्यप्रणालीवर प्रेरित होत उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकत शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

तर या पक्ष प्रवेशाने कर्जत तालुक्यात आदिवासी बांधवांचे विशेष प्रेम उपजिल्हा प्रमुख नितीन दादा सावंत यांच्यावर दिसत असून उपजिल्हाप्रमुख देखील अत्यंत प्रामाणिकपणे आदिवासी बांधवांचा शिवसेना कुटुंबात स्वागत करीत असून आदिवासी बांधवांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळोवेळी आवाज उठविण्यात येईल व प्रयत्न केले जातील , असे आश्वासन उपजिल्हाप्रमुख नितीन दादा सावंत यांनी याप्रसंगी दिले.
- Advertisment -

You cannot copy content of this page