Thursday, September 19, 2024
Homeपुणेलोणावळाउपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीस लोणावळा विरोधी पक्षाकडून नाराजी....

उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीस लोणावळा विरोधी पक्षाकडून नाराजी….

लोणावळा आज ऑनलाईन पद्धतीने घेतल्या गेलेल्या लोणावळा नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीस विरोधी पक्षाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नगरपरिषद क्षेत्रात ब्रेक द चैन अंतर्गत 15 जून पर्यंत निर्बंध लावण्यात आले आहेत.

त्यानुसार पुणे जिल्हा प्रशासन अधिकारी यांनी लोणावळा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना सदरची निवडणूक 15 तारखेपर्यंत रद्द करण्यात यावी असे आदेश दिले असून ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणारी निवडणूक बेकायदेशीर असून त्यासाठी विरोधी पक्षाकडून एकही उमेदवारी अर्ज भरला जाणार नाही. सदर निवडणुकीत सदस्यांनी हात उंच करून उमेदवारांना मतदान करावयाचे असते आणि त्यासाठी सर्व सदस्य प्रत्यक्ष उपस्थित असले पाहिजेत. प्रत्यक्ष घेतलेल्या निवडणूकीत पारदर्शकता असते.

आज ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणाऱ्या निवडणुकीत संबंधित सदस्यांवर दडपण आणून चुकीचे मतदान करण्यात येईल आणि सर्व सदस्यांच्या अनुपस्थित घेतली जाणारी निवडणूक बेकायदेशीर असेल असे मत विरोधी पक्षाकडून व्यक्त करण्यात आले. तसेच आज उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक घेतल्यास त्यास विरोधी पक्षाकडून तीव्र विरोध असेल असे विरोधी पक्षाच्या शादान चौधरी ( शिवसेना गट नेत्या ) तसेच सुनील इंगुळकर, माणिक मराठे, शिवदास पिल्ले, कल्पना आखाडे, सिंधू परदेशी, नितीन अगरवाल, भरत हारपुडे, सेजल परमार, गौरी मावकर, अपर्णा बुटाला, अंजना कडू, जयश्री आहेर, इत्यादी नगरसेवक व नगरसेविकांनी बोलताना सांगितले. त्यासंदर्भात नगरपरिषदेला सर्वांच्या हस्ताक्षर असलेले लेखी पत्रक देण्यात आले आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page