उर्स शरीफ निमित्त “हजरत कासिम शाह वली” दर्गा येथे काँग्रेस (आय ) ने दिला सर्व धर्म समभावचा संदेश…

0
134

लोणावळा : सर्व धर्म समभाव चा संदेश देत लोणावळा शहर काँग्रेस (आय) तर्फे हजरत कासिम शाह वली रहे यांच्या उर्स निमित्त ढोल ताशाच्या गजरात चादर आणि फूल चढवण्यात आले या वेळी दर्गाशरीफ मध्ये सुन्नी मुस्लिम ट्रस्ट तर्फे उद्योजक झीशान भाई शेख, उद्योजक फरहानभाई शेख यांनी मान्यवरांचे स्वागत केले.

तसेच सुन्नी मुस्लिम ट्रस्ट च्या वतीने काँग्रेस (आय)चे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस निखिल कवीश्वर ,काँग्रेस ( आय ) चे लोणावळा शहर निरीक्षक मा.नगरसेवक नासीर , मा.नगराध्यक्ष उषाताई चौधरी, अल्पसंख्याक अध्यक्ष जाकीर भाई शेख, सुबोध खंडेलवाल, युवा नेते फिरोज बागवान,केतन जाधव, सनी गवळी, दिपराज चौधरी,मंगेश बालगुडे इत्यादी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.


यावेळी शुभम जोशी, मजहरभाई,हाफिझ शेख, डॅरिल रॉइज्, अयाझ शिकीलकर,हसरत बेलीम,फारूख शेख,संजय तळेकर,जमिलभाई शेख,आकाशभाऊ परदेशी,सूर्यकांत औरंगे,अमोल शेडगे,अमित बारसे,गुड्डू मोरे इत्यादी उपस्थित होते.तसेच या वेळी ख्वाजा गरीब नवाज कमिटी तर्फे पण उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.