Tuesday, May 30, 2023
Homeपुणेलोणावळाएकलव्य फौंडेशन आयोजित भव्य रोजगार मेळाव्यास तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद...

एकलव्य फौंडेशन आयोजित भव्य रोजगार मेळाव्यास तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…

लोणावळा (प्रतिनिधी): एकलव्य फौंडेशन मावळ च्या वतीने भव्य रोजगार मेळावा संत तुकाराम महाराज पादुका स्थान वाकसई येथे संपन्न झाला.
स्थानिक सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नोकरी उपलब्ध करून देण्यासाठी एकलव्य फौंडेशनचे अध्यक्ष प्रवीण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.या मेळाव्यात शेकडो तरुण तरुणनींनी आपला सहभाग नोंदविला.तर मावळ तालुक्यातील राजकीय कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी उपस्थित राहुन रोजगार मेळाव्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी विविध अशा एकूण 19 नामांकित कंपन्यामधील व्यवस्थापक अधिकारी उपस्थित होते. या रोजगार मेळाव्यात आठवी ते बारावी शैक्षणिक पात्रता असणाऱ्या तब्बल 273 तरुणांनी प्रवेश अर्ज केले. त्यातील 70 अर्ज हे बाद करण्यात आले असून पात्रता असणाऱ्या 153 तरुणांना कंपन्यांमधील नोकरीचे नियुक्ती पत्रक प्रदान करण्यात आले.
सदर रोजगार मेळावा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी एकलव्य फौंडेशन मावळ तालुक्याचे विकास धोत्रे, ओंमकार पवार, अविनाश देसाई,विजय देशमुख, सुनील पवार, राहुल वाटाणे, अजय सुरवडकर, गणेश शिंदे, महादेव भवर, सागर धनवटे, विठ्ठल जाधव, व किरण विटेकर आदींनी विशेष परिश्रम घेतले तर यावेळी मावळातील विविध कंपन्यांचे व्यवस्थापक व अधिकारी यांनी उपस्थित राहून अर्ज तपासणी करत तरुणांना नियुक्ती पत्रक प्रदान करण्यात आले.

You cannot copy content of this page