एकविरा गडावर रंगला आई एकविरा देवीचा मानाचा पालखी सोहळा…

0
130

लोणावळा : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या कार्ला गडावरील कुलस्वामिनी आई एकविरा देवीचा मानाचा पालखी सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

दोन वर्षानंतर साजरी होणारी आई एकविरा देवीची चैत्री यात्रा व मानाचा पालखी सोहळा पाहण्यासाठी भाविकांची ओसांडून गर्दी झाली होती. मुंबई ठाणे कल्याण या भागातून व संपूर्ण जिल्ह्यातून कोळी समाजाबरोबर इतर समाज मोठया संख्येने गडावर उपस्थित होता.

माय माऊली चा उदो उदो या जय घोषात बँड, बाजा व ढोल ताशांच्या गजरात पालखी सोहळा संपन्न झाला. आई एकविरा देवीच्या चैत्री यात्रे निमित्त पोलीस प्रशासन व तालुका प्रशासनाचा चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. यावेळी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील व लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी स्वतः गडावर उपस्थित राहुन गडावरचे नियोजन सांभाळले. मागील दोन वर्षांपासून एकविरा देवीच्या यात्रेसाठी भाविक वाट पाहून होते.

यंदा या यात्रेचा मनसोक्त आनंद भाविकांना घेता आला त्यामुळे भाविकांकडून आनंद व्यक्त करण्यात आला तसेच यंदाच्या यात्रेसाठी प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी केलेल्या उत्तम नियोजनाबद्दल प्रशासनाचे आभार भाविकांकडून व्यक्त करण्यात आले.