एकविरा देवी जत्रेच्या बंदोबस्त संदर्भात पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांचे पोलिसांना मार्गदर्शन !

0
69

लोणावळा : श्री एकवीरा देवीच्या चैत्री यात्रेच्या पार्श्वभूमीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची आढावा बैठक संपन्न झाली.

वेहेरगाव येथील एकविरादेवीच्या चैत्री यात्रेच्या पाश्वभुमीवर पोलिस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा ग्रामीण पोलिसांची आढावा बैठक लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन येथे पार पडली.

कोरोना या महामारी मुळे एकविरा देवीची चैत्री यात्रा मागील दोन वर्ष अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. परंतू यावर्षी कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आल्याने तसेच एकविरा देवीचे मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आल्याने भाविकांची प्रचंड मोठी गर्दी होण्याची दाट शक्यता असल्याने यात्रा काळात कसलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तसेच यात्रा काळात भाविकांना सुखसुविधा देण्यासाठी काय काय उपाय योजना करता येतील यासाठी सदर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी दिली.

पुढील काळात सर्व विभागाची बैठक सुध्दा होणार आहे. पूर्वतयारी म्हणून पोलिस प्रशासनाने ही बैठक घेतली. सदर बैठकीत यात्रा काळात भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी काय काय उपाय योजना करता येतील त्याचबरोबर गडावर भाविकांसाठी सोईसुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली.

यावेळी लोणावळा ग्रामीण पोलिस निरिक्षक प्रविण मोरे,सहायक निरिक्षक निलेश माने,अनिल लवटे यांंच्यासह लोणावळा पोलिस स्टेशन सर्व पोलिस कर्मचारी तसेच कार्ला व वेहरगावचे पोलिस पाटील उपस्थित होते.