Tuesday, June 6, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडएका ट्रेलरची चार वाहनांना धडक, दोन वाहने दरीत कोसळली, तर एकाचा मृत्यू…

एका ट्रेलरची चार वाहनांना धडक, दोन वाहने दरीत कोसळली, तर एकाचा मृत्यू…

खोपोली (प्रतिनिधी) : एका ट्रेलरने 4 वाहनांना धडक दिली असून 2 ट्रक दरीत पडले तर यामध्ये ट्रेलर चालकाचा मृत्यू झाला आहे . आज पहाटे पुणे- मुंबई दृतगती मार्गावर बोर घाट येथे ही घटना घडली .
या अपघातात टेलर क्र. एम एच 46 बी एम 9397 वरील चालक अजित जाधव , ( रा . सांगली ) यास गंभीर दुखापत झाली असल्याने त्याचा मृत्यू झाला . तसेच ट्रक क्र. के ए 51 ए जे 5978 वरील चालक मंगळू हा जखमी झाला आहे . आज पहाटे साडेचारच्या दरम्यान पुणे मुंबई लेन कि.मी 37.500 येथे हा अपघात झाला.
अजित जाधव हा पुणे ते मुंबई बाजूकडे जात असताना त्याच्या गाडीचा टायर फुटल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले व त्याच्या बाजूने जाणाऱ्या टेम्पो क्र. एम एच 13 डी क्यू 3101ला त्याने आधी धडक दिली व त्यानंतर डाव्या बाजूकडील ट्रक क्र. के ए 39 ए 0344 ला धडक दिली . त्यामुळे हा ट्रक पलटी झाला.या वाहनांची केबिन तुटल्याने वाहने 100 फूट खोल दरीत पडली . चालक मंगळू हा ट्रकच्या केबिनमध्ये अडकल्याने त्यास देवदूत टीमच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आले आहे . त्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याला उपचाराकरिता आय आर बी च्या रुग्णवाहिकेने एम जी एम हॉस्पिटल पनवेल येथे पाठविण्यात आले आहे .
तसेच मृत्यू झालेल्या चालकास खोपोली येथे नगर पालिका हॉस्पिटलमध्ये रवाना करण्यात आले आहे.अपघातातील वाहने रस्त्याच्या कडेला असल्याने वाहतुकीस अडथळा झाला नाही व वाहतूक सुरळीत चालू आहे.
अपघाची माहिती मिळताच खोपोली पोलीस स्टेशन , म.पो. केंद्र बोरघाट पोलीस स्टाफ तसेच देवदूत व आय आर बी टीम आदींनी घटना स्थळी धाव घेतली व बचाव कार्य करत आहेत.

You cannot copy content of this page