Thursday, June 1, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडएक्स्प्रेस हायवेवर भिषण अपघात , कागदाच्या रिम खाली येऊन कार झाली चपटी,...

एक्स्प्रेस हायवेवर भिषण अपघात , कागदाच्या रिम खाली येऊन कार झाली चपटी, एका डॉक्टर चा जागीच दुर्दैवी मृत्यू..

.

खालापूर ( दत्तात्रय शेडगे)
मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर सकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातात ट्रेलरवरून कागदी रिम कार वर पडल्याने त्याच्या वजनाने कार अक्षरशः चपटी झाली. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. कार ला फाडून त्याचा मृतदेह बाहेर काढावा लागला. सदर चालक नवीमुंबई मधील पेशाने डॉक्टर असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार सकाळी साडेदहा च्या सुमारास नवीमुंबई येथील डॉक्टर आदित्य तंखीवले हे हुंडाई आयटेन या त्यांच्या कार ने पुण्याहून मुंबईकडे येत असताना एक्स्प्रेस हायवेवर किलोमीटर 40 या अंतरावर ते आले असता त्यांच्या समोर जात असलेला ट्रेलर ट्रक एका वळणावर कलांडला व पलटी झाला त्या ट्रेलर मध्ये कागदाचे भले मोठे रिम होते व ते रिम त्या ट्रेलर मधून सटकले त्यातील काही रिम मागून जात असलेल्या आदित्य तंखीवले यांच्या कार वर ही कोसळले.

रिमचे वजन खूप असल्याने काही कळायच्या आत व सावरायच्या आत आदित्य यांची कार त्या रिमखाली दबली गेली व अक्षरशः चपटी झाली आणि त्यात आदित्यही दाबले गेले. अपघाताची माहिती मिळताच बोरघाट पोलीस, देवदूत यंत्रणा, अपघातग्रस्तानच्या मदतीला या संस्थेचे सदस्य घटनास्थळी पोहचले पण खूप वेळ गेला होता कार मध्ये आदित्य अडकून पडले होते.सर्व बचाव यंत्रणेने कार ला अक्षरशः फाडून आदित्य यांना बाहेर काढले पण त्यांचा जागीच मृत्यू झाला होता.

You cannot copy content of this page