Thursday, June 1, 2023
Homeपुणेलोणावळाएक गावठी पिस्टल, सहा काडतूसांसह एकास अटक लोणावळा ग्रामीण पोलिसांची कामगिरी...

एक गावठी पिस्टल, सहा काडतूसांसह एकास अटक लोणावळा ग्रामीण पोलिसांची कामगिरी…

लोणावळा : अवैध रित्या अग्नीशस्त्र बाळगणाऱ्या इसमाला शस्त्रासह पकडण्यात लोणावळा ग्रामीण पोलीसांना यश आले आहे.अंकुश सुरेश मानकर ( वय 37, रा. कामशेत इंद्रायणी कॉलनी ) याला हत्यारा सह अटक केली असून भारतीय हत्यार कायदा कलम 3(25), महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37(1)(3),135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ . अभिनव देशमुख यांनी जिल्हयामध्ये अवैध रित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांची गोपनीय माहिती काढून त्यांच्यावर कार्यवाही करणेबाबत दिलेल्या आदेशानुसार पोलीसांनी त्यांचे गोपनीय बातमीदार नेमले . त्यामध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हृद्दीमध्ये फांगणे , ता . मावळ जि . पुणे येथे एक इसम अंकुश सुरेश माणकर ( वय 37 वर्षे, रा . कामशेत इंद्रायणी कॉलणी,ता . मावळ जि . पुणे ) हा त्याच्या जवळ बेकायदेशिर अग्नीशस्त्र बाळगून आहे अशी माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलीस पथकाने त्याच्यावर छापा टाकल्यास त्याच्या जवळ एक गावठी बनावटीचे पिस्टल व 6 जिवंत काडतूस मिळून आले. हत्यार व काडतूसे जप्त करून आरोपीस ताब्यात घेण्यास लोणावळा ग्रामीण पोलीसांना यश मिळाले आहे .

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ . अभिनव देशमुख,अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी, लोणावळा विभाग राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने , सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ , पोलीस हवालदार विजय गाले , पोलीस नाईक संतोष शेळके , नितीन कदम , होमगार्ड भिमराव वाळूज यांनी ही अप्रतिम कारवाई केली आहे .

लोणावळा ग्रामीण पोलीस पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली असून यापुढेही अशा प्रकारे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर पोलीसांची करडी नजर असणार आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने व सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राऊळ यांनी दिली आहे.

You cannot copy content of this page