एक तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी या उपक्रमास वडगाव मध्ये प्रारंभ…

0
89

वडगाव मावळ : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नामदार जयंतराव पाटील यांच्या आदेशानुसार “एक तास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी, आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी” या उपक्रमाअंतर्गत आज वडगांव शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासंदर्भात महिन्यातील पहिल्या शनिवारची बैठक संपन्न झाली.

मावळचे आमदार सुनील आण्णा शेळके यांच्या सूचनेनुसार तालुकाध्यक्ष गणेशभाऊ खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वडगाव शहरातील शासकीय विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्यांच्या भोवताली असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी तसेच गावपातळीवर नागरिकांच्या विविध समस्या मार्गी लावताना शहरातील पक्षाचे जेष्ठ आजी माजी पदाधिकारी, शहर अध्यक्ष, उपाध्यक्ष, नगरसेवक, प्रभाग अध्यक्ष, बुथ कमिटी, प्रभाग संघटक, कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी, सर्व सेलचे प्रमुख, तसेच पक्षाचे युवक कार्यकर्ते यांनी वेळोवेळी सर्व सामान्य माणसांना मदत करताना पक्षाचे धैर्य धोरणे पोहचवीणे गरजेचे आहे.

यावेळी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच सर्व सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.