Wednesday, June 7, 2023
Homeक्राईमएक वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा छडा लावण्यात गुन्हे शाखा युनिट 1 यशस्वी...चार आरोपी...

एक वर्षांपूर्वी झालेल्या खुनाचा छडा लावण्यात गुन्हे शाखा युनिट 1 यशस्वी…चार आरोपी जेरबंद !

पिंपरी : चिखली येथील हरगुडे वस्ती येथे कमल खाणेकर उर्फ नुरजहा कुरेशी यांचा त्यांच्या राहत्या घरी हातपाय बांधून , तोंडाला चिकटटेप लावून , तिचा गळा दाबून निर्घृणपणे हत्या केल्याची घटना 5 ऑगस्ट 2021 रोजी घडली होती.त्याबाबत चिखली पोलिस ठाण्यात भा . द . वि . कलम 302 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा तपास करत आज एक वर्षानंतर या प्रकरणातील आरोपी मोहंमद शेख ( वय 25 वर्षे , रा . साय नगर देहू रोड ) , वासिब खान ( रा . झेंडेमळा , देहूगाव ) , अब्दुल अन्सारी ( रा . रुपीनगर तळवडे ) , रईसउद्दीन राईन ( रा . मोरेवस्ती चिखली ) या चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

एक वर्षांपूर्वी गुन्हेगारांनी नियोजनबद्ध खून केलेला असा कोणताही पुरावा पोलिसांनी सोडला नव्हता . पोलिस जंगजंग पछाडत होते . परंतु , हाती काहीही लागत नव्हते . गुन्हे शाखा युनिट -1 ने उत्तर प्रदेश व बिहार राज्यातून आलेले व चिखली व एमआयडीसी भोसरी परिसरात राहणारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांना, बऱ्याचशा आरोपींना युनिट कार्यालयात आणून त्यांच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता .युनिट -1 ने चिखली पोलिस ठाण्यात आर्म ऍक्टच्या गुन्ह्यामध्ये अटक आरोपी मोहंमद शेख याला चौकशी कामी गुन्हे युनिट -1 शाखा कार्यालयात आणले . त्याचे वर्तन संशयास्पद असल्याचे त्यांना आढळून आले . त्याच्याकडे सखोल तपास करता माहिती मिळाली , की तो व त्याचे साथीदार वसीब खान , अब्दुल अन्सारी , रईसउद्दीन राईन असे चौघांनी मिळून हरगुडे वस्ती येथे एकटी राहणारी महिला कमल खाणेकर उर्फ नुरजहा कुरेशी हिचा खून केला होता.


तसेच , सदरची महिला ही एकटीच राहत असून तिच्या अंगावर भरपुर प्रमाणात दागिने असतात त्याचबरोबर ती जमिनीची खरेदी विक्री करत असल्याने तिच्या घरात मोठ्या प्रमाणात पैसे असण्याची शक्यता असल्याने तिचा गेम केल्यास पूर्ण आयुष्य सेट होईल असा विचार केला . त्यांनी नियोजन करून 5 ऑगस्ट 2021 रोजी मध्यरात्री त्या महिलेच्या घरात प्रवेश करून तिचा निर्घृण खून करून तिच्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरून नेली.

पोलिस उप आयुक्त काकासाहेब डोळे व सहाय्यक पोलिस आयुक्त प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली . आरोपी क्र . 1 कडून माहिती मिळाल्यानुसार त्याचा साथीदार वासीब खान याला देहू परिसरातून ताब्यात घेण्यात आले,अब्दुल अन्सारी व रईसउद्दीन राईन हा पालघर व बांद्रा , मुंबई येथे असल्याची माहिती मिळाल्याने दोन पथके तयार करण्यात आली होती . आरोपी ठिकाण वारंवार बदलत होते . पालघर येथे गेलेल्या पोलीस पथकाचा सुगावा लागल्याने आरोपी प्रथम दहिसर परिसरात नंतर बोरिवली वरून ठाणे शहरात गेल्याची माहिती मिळत होती . तपास पथकाने त्याचा पाठलाग लोणावळा एक्सप्रेस हायवे इथपर्यंत करून अब्दुल अन्सारी याला ताब्यात घेण्यात आले . तसेच बांद्रा , मुंबई येथे गेलेल्या पोलीस पथकाने सुद्धा आरोपी राईनला किवळे फाटा , रावेत या ठिकाणी सापळा रचून ताब्यात घेतले.

You cannot copy content of this page