Saturday, October 1, 2022
Homeपुणेलोणावळाएमटीडीसी वर ही गुन्हा दाखल व्हावा..श्रीधर पुजारी, सुरेखा जाधव !

एमटीडीसी वर ही गुन्हा दाखल व्हावा..श्रीधर पुजारी, सुरेखा जाधव !

लोणावळा (प्रतिनिधी ): मागील महिन्यात स्वीमिंग पूल मध्ये पडून एका 2 वर्षीय शिवबाचा दुर्दैवी मृत्यू झाला त्याच्या पुढील आठवड्यात आणखी एका तरुणाचा स्वीमिंग पूल जवळील लाईटीचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना लोणावळ्यातील तुंगार्ली व गोल्ड व्हॅलि परिसरात घडली या दुर्दैवी घटनेने लोणावळा शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती, ही घटना घडून 20 दिवस उलटून गेले तरीही यातील दोषींवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला न्हवता, मात्र अखेर याप्रकरणी लोणावळा शहर पोलिसांनी सहा जणांसह लोणावळा नगरपरिषदेवर देखील गुन्हा दाखल केला आहे .

मृत शिवबाचे वडील अखिलकुमार नारायणराव पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भा.द.वि. कलम 304 ( अ ) , 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ज्या स्विमिंग पुलमध्ये ही दुर्घटना घडली तो पूल अनधिकृत होता आणि त्याकडे नगरपरिषदेने दुर्लक्ष केले होते म्हणून नगरपरिषदेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे.लोणावळा शहर हे पर्यटन स्थळ तसेच थंड हवेचे ठिकाण म्हणून पर राष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या लोणावळा शहरात पर्यटकांना खाजगी बंगले भाड्याने देण्याचा एक मोठा ट्रेंड सध्या सुरू आहे . येथे येणारे बहुतेक पर्यटक हे हॉटेल पेक्षा अशा खाजगी बंगल्यांना जास्त पसंती देतात . मात्र त्यातही ज्या बंगल्यात जलतरण तलाव आहे असे बंगले प्राधान्यक्रमाने आणि जास्त पैसे देऊन बुक केले जातात.


लोणावळा नगरपरिषद हद्दीमध्ये असे बेकायदा स्विमिंग पूल असलेले असंख्य बंगले आणि रो हाऊस आहे . व्यवसायाची गरज म्हणून बंगले धारकांकडून बांधण्यात येत असलेल्या या स्विमिंग पुल व या अनधिकृत बंगलेधारकां बरोबर लोणावळा नगरपरिषदेवर गुन्हा नोंदविला असून या बंगले धारकांना कुठलीही सहनिशा न करता एम टी डी सि परवाना दिला गेला असल्यामुळे आता एमटीडीसि वर ही गुन्हा दाखल होण्याची मागणी लोणावळा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, यांच्यावतीने करण्यात येत आहे यावेळी बोलताना सुरेखा जाधव व श्रीधर पुजारी म्हणाले लोणावळा शहरात ज्याप्रमाणे शेकडो अनधिकृत पूल आहेत , तसेच शेकडो बंगलेधारक अनधिकृत व्यवसाय देखील करीत आहेत.

शिवाय एमटीडीसीच्या न्याहारी निवास योजनेचा फायदा घेऊन शेकडो बंगले भाड्याने दिले जात आहेत . अशा बंगल्यांना कागदपत्रात नगरपरिषदेच्या ना हरकत प्रमानपत्राशिवाय व्यवसायाला परवानगी दिली जात आहे.तेथील सुरक्षा मानकांचा देखील सर्वे केला जात नाही . ज्या बंगल्यात वरील दुर्घटना घडली त्या बंगल्याला देखील एमटीडीसीचे प्रमाणपत्र दिले गेले होते . त्यामुळे ज्याप्रकारे लोणावळा नगरपरिषदेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलं गेलं आहे , त्याप्रमाणे एमटीडीसीवर देखील गुन्हा दाखल केला गेला पाहिजे.

- Advertisment -

You cannot copy content of this page