Friday, June 9, 2023
Homeपुणेएमपीएससी विध्यार्थ्यांच्या आंदोलनास काँग्रेस प्र.सचिव निखिल कवीश्वर यांचा जाहीर पाठिंबा…

एमपीएससी विध्यार्थ्यांच्या आंदोलनास काँग्रेस प्र.सचिव निखिल कवीश्वर यांचा जाहीर पाठिंबा…

पुणे (प्रतिनिधी): मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या बेमुदत आंदोलनास काँग्रेस (आय) चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश सचिव निखिल कवीश्वर आणि पदाधिकारी यांनी उपस्थित राहून आंदोलनकर्त्यांना जाहीर पाठिंबा दिला.
नवी परीक्षा पद्धती 2025 पासून लागू करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत.
ऊन, वारा याची पर्वा न करता विद्यार्थ्यांचे आंदोलन बेमुदत सुरूच आहे.
जानेवारीच्या अखेरीस राज्य सरकारने नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्याची अंमलबजावणी पुढे ढकलली होती. मात्र, आता तीन आठवडे उलटूनही यावर काहीही कार्यवाही होत नसल्याने विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरले आहेत. दोन रात्र उलटूनही पुण्यातल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात विद्यार्थी बसून आहेत. बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे विध्यार्थ्यांचे बेमुदत आंदोलन सुरु आहे.एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन स्थळी आमरण उपोषण करण्यात येणार आहे.
नवीन अभ्यासक्रम 2025 पासून लागू व्हावा यासाठी राज्य सरकारकडून पत्र देण्यात आलं मात्र त्यावर अंमलबजावणी अद्याप झाली नसल्याचे काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे यांनी म्हटले. आंदोलनस्थळी आदी पदाधिकाऱ्यांसह लोणावळा शहरातील काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश सचिव निखिल कवीश्वर यांनी देखील भेट देऊन विद्यार्थ्यांच्या मागण्या रास्त असून सरकारने त्याबद्दल सकारात्मक निर्णय लवकरात लवकर घ्यावा असे म्हंटले आहे.

You cannot copy content of this page