एल सी बी ची दमदार कामगिरी,,,2 पिस्टल 4 जिवंत काडतूसांसह दोघांना अटक…

0
773

वडगाव मावळ : वडगांव मावळ येथून 2 गावठी पिस्टल व 4 जिवंत काडतुसे आणि दोन आरोपी पुणे ग्रामीण गुन्हे शाखेने अटक केली आहे.अनिल राघू शिंदे ( वय 33, रा. पवना नगर, ता.मावळ ) व धर्मेश रवींद्रकुमार जयस्वाल ( वय 23, रा. काळा तलाव, भिकाजी भैया चाळ, कल्याण पश्चिम, जि. ठाणे ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहिती नुसार शाखेचे पथक वडगाव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस कॉन्स्टेबल प्राण येवले यांना गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार वडगांव मावळ पोलीस स्टेशन हद्दीत जुना पुणे ते मुंबई हायवे रोडवर वडगांव-तळेगाव चौकात हायवेच्या बाजूला उभे असलेल्या दोन व्यक्तींच्या संशयास्पद हालचाली वरून व मिळालेल्या बातमीच्या वर्णनावरून अनिल राघू शिंदे,धर्मेश रवींद्रकुमार जयस्वाल यांना सापळा रचून मोठ्या शिताफीने ताब्यात घेवून त्यांची अंगझडती घेतली असता त्यांचेकडून विनापरवाना व बेकायदेशीर बाळगलेल्या प्रत्येकी 1 गावठी पिस्टल व मॅगझीन मध्ये 2 जिवंत काडतुस असे 2 गावठी पिस्टल व 4 जिवंत काडतुसे असे एकुण किं.रु.1,00,400/- (एक लाख चारशे रुपये) चा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे.

आरोपी अनिल राघू शिंदे हा रेकॉर्ड वरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वीचे 2 गुन्हे दाखल आहेत.सदर आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी वडगाव मावळ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे,स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर धोंडगे,सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे ,पोलीस नाईक अमोल शेडगे,पोलीस नाईक बाळासाहेब खडके,पोलीस कॉन्स्टेबल प्राण येवले,पोलीस कॉन्स्टेबल मंगेश भगत,महिला पोलीस कॉन्स्टेबल पूनम गुंड,महिला पोलीस कॉन्स्टेबल सुजाता कदम यांच्या पथकाने सदर कारवाई केली असून पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करत आहेत..