Wednesday, June 7, 2023
Homeपुणेतळेगावऑन ड्युटी ट्राफिक वार्डनरवर टेम्पो चालकाकडून जीवघेणा हल्ला...

ऑन ड्युटी ट्राफिक वार्डनरवर टेम्पो चालकाकडून जीवघेणा हल्ला…

तळेगाव दाभाडे : नंबर प्लेट नसलेला टेम्पो अडवल्याने कर्तव्यावर असलेल्या ट्राफिक वार्डनवर टेम्पो चालकाकडून जीवघेणा हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवार दि.8 रोजी दुपारी 1 व रात्री 8:30 वा. च्या सुमारास घडला.

आरोपी टेम्पो चालकाला अटक करण्यात आली असून सुकरोली उर्फ मुन्ना मकबूल शेख ( वय 31, रा. कातवी, ता. मावळ, जि. पुणे ) असे त्याचे नाव आहे.

याप्रकरणी ट्राफिक वार्डनर मारुती गव्हाणे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे .

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , फिर्यादी हे ट्राफिक वार्डनर म्हणून तळेगाव स्टेशन चौकात कर्तव्यावर होते . बुधवारी दुपारी नंबर प्लेट नसलेला एक टेम्पो वडगाव बाजूने येताना दिसल्याने त्यांनी टेम्पो थांबवला . टेम्पो चालकाकडे कागदपत्रांची मागणी केली . मात्र चालकाने तो तळेगाव दाभाडे येथील प्रॉपर असल्याचे सांगत कागदपत्र दाखवणार नसल्याचा दम दिला . तसेच बघून घेण्याची धमकी देत वार्डनर जीवघेणा हल्ला केला.

You cannot copy content of this page